India vs West Indies, T20 Record : भारत-वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत पाच सामन्यांटी टी20 मालिका खेळणार आहे. भारताने वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिके 3-0 ने मात देत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता टी20 मालिकाही सर करण्यासाठी भारत सज्ज झाला असून आज रंगणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ टी20 क्रिकेट विश्वातील दोन आघाडीचे संघ आहेत. सर्वात पहिला टी20 विश्वचषक भारताने जिंकला असून वेस्ट इंडीजने सर्वाधिक दोन टी20 विश्वचषक जिंकले आहेत. आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंसह वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचा खेळ सर्वांनाच पाहायला आवडतो. आजही वेस्ट इंडीजचे स्फोटक फलंदाज आणि भेदक गोलंदाज मैदानात उतरतील. भारतीय संघही आपले दिग्गज घेऊन मैदानात उतरेल. तर सामन्यापूर्वी भारताचा वेस्ट इंडीजविरुद्धचा आजवरचा रेकॉर्ड पाहूया...
भारत- वेस्ट इंडीज T20 Head to Head
टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघ आतापर्यंत 20 वेळा आमने सामने आले आहेत. यावेळी भारताचं पारडं वेस्ट इंडीजसमोर जड राहिलं असून भारताने या सामन्यांतील 13 सामने जिंकले आहेत. तर, 6 सामने वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. याशिवाय, एक सामना अनिर्णित देखील राहिला आहे. दरम्यान भारताने आताच एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकल्याने टी20 मालिकेतही अशीच कामगिरी करेल, की वेस्ट इंडीज तगडी टक्कर देईल हे पाहावं लागेल.
संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), अक्षर पटेल, हार्दीक पांड्या, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान
संभाव्य वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, अकेल हुसेन.
हे देखील वाचा -