IND vs IRE : आज भारत आणि आयर्लंड  (India vs Ireland) यांच्यात पहिला टी20 सामना आज आयर्लंडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. आयर्लंडमधील डबलिन क्रिकेट स्टेडियमवर (Castle Avenue, Dublin) हा सामना खेळवला जाणार असून आजवर आयर्लंडने एकदाही भारताला मात दिलेली नसली तरी सामना होमग्राऊंडवर असल्याने आयर्लंड जिंकण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करेल. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 9 वाजता सुरु होणार असून 8 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे. 


सामना पार पडणाऱ्या आयर्लंडमधील डबलिन क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण याठिकाणी आजवर अधिक सामने झाले नसले तरी जेही सामने झालेत त्यात 9 एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाना विजय मिळाला आहे. तर 14 सामन्यांत प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या संघानी विजय मिळवला आहे. त्यामुळे सामन्यात नाणेफेकही महत्त्वाची बाब असणार आहे. 


कशी आहे मैदानाची स्थिती?


आयर्लंडच्या डबलिन क्रिकेट स्टेडियमवर आज सामना होणार असून या ठिकाणी आजवर केवळ तीन टी20 सामने झाले असून यात एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला असून दोन सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यात मैदानाच्या खेळपट्टीवर गवत अधिक असल्याने गोलंदाजांना फायदा होतोच पण फलंदाजही चांगली कामगिरी करु शकतात. ज्यामुळे एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.


आतापर्यंत भारत विरुद्ध आयर्लंड 


भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळवले गेले आहे. या सर्व सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताचचं पारडं जड दिसून आलं आहे. कारण तीन पैकी तिनही सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, आयर्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता या दोन सामन्यांपैकी आजचा सामना जिंकून भारत आपला विजयी रथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. तर आयर्लंड सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय मिळवू इच्छित असेल.



हे देखील वाचा-