ICC Test Championship: क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळालं. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. मालिका विजयासह टीम इंडिया पुन्हा एकदा ICC Test Championship स्पर्धेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. यानंतर आता टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याच्या शक्यता वाढली आहे.


एडलेडमध्ये खेळलेली पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने मेलबर्नमधील कसोटी सामना जिंकला तर सिडनीमध्ये सामना अनिर्णित राखला. यानंतर, मंगळवारी ब्रिस्बेनमधील निर्णायक कसोटी सामना तीन विकेट्सने जिंकून टीम इंडियाने मालिका खिशात घातली.


Ind vs Aus | भारतीयांना कमी लेखण्याची चूक कधीही करु नका, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचं सूचक वक्तव्य


ICC Test Championship स्पर्धेत 71.7 टक्के गुणांसह भारताने अव्वल स्थान गाठलं आहे. तर 70 टक्के गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत आस्ट्रेलियाची घसरण झाली आहे. आस्ट्रेलिया आता 69.2 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.





इंग्लंड कसोटीनंतर अंतिम सामन्याबाबत निर्णय


आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत अव्वल स्थानावर पोहोचल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. ‘गाबा कसोटीतील दणदणीत विजयांनंतर भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे’, असं ट्वीट आयसीसीने केलं आहे.


भारताला आता इंग्लंडबरोबरची चार कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकारने जिंकणे आवश्यक आहे. जर भारताने असं केलं तर जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या कसोटी चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आपले स्थान निश्चित करेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत 5 फेब्रुवारीपासून होणारी कसोटी मालिका सुरू होणार आहे.


इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा


इंग्लंड विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी प्रथमच अष्टपैलू अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.


India Gabba Test Win Historic | गाबामध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण, 1988 नंतर पहिला पराभव