ICC World Test Championship 2021-2023 Points Table: बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघानं पहिला कसोटी (India Beat Bangladesh) सामना जिंकला. तर, ऑस्ट्रेलियानंही घरच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा (Australia Beat South Africa) दारुण पराभव केला. ज्यामुळं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळतंय.  ऑस्ट्रेलियाच्या विजयानं भारताच्या आनंदात भर घातलीय. ऑस्ट्रेलियाचं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालंय. या हंगामात ऑस्ट्रेलियाचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पुढील वर्षी जूनमध्ये ओव्हल येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाईल.

भारतानं पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. दुसरीकडं ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्सनं विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांपूर्वी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या स्थानावर होता. दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 76.92 गुणांच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. तर, भारतीय संघ 55.77 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय.

आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:

क्रमांक संघ विजयी टक्केवारी गुण
1 ऑस्ट्रेलिया 76.92 120
2 भारत 55.77 87
3 दक्षिण अफ्रीका 54.55 72
4 श्रीलंका 53.33 64
5 इंग्लैंड 44.44 112
6 पाकिस्तान 42.42 56
7 वेस्टइंडीज 40.91 54
8 न्यूजीलैंड 25.93 28
9 बांग्लादेश 12.12 16
 

दक्षिण आफ्रिकेची तिसऱ्या स्थानावर घसरण
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघाची (54.55 गुण) तिसऱ्या स्थानावर घसरण झालीय. श्रीलंका 53.33 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या आणि इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडची विजयी टक्केवारी 44.44 इतकी आहे.

भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी शर्यत
ऑस्ट्रेलियाचं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित मानलं जातंय. तर, भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी शर्यत लागलीय. आसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जून 2023 मध्ये इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2021 मध्ये साउथॅम्प्टन येथे शेवटचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात भारताला आठ विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला.

हे देखील वाचा-