World Cup 2023 : बहुप्रतिक्षित क्रिकेटचा महासंग्राम सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक आहे. भारतात होणारा विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) 5 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे. यंदा विश्वचषक स्पर्धा भारतात (India) होत असल्याने भारतीय क्रिडा प्रेमींची उत्सुकला आणि उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष वर्ल्ड कप 2023 कडे आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) वर विश्वचषक 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. गतविजेते इंग्लंड (England) आणि उपविजेता न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील सलामी सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध रंगणार आहे. तर, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे.

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा रणसंग्राम

5 ऑक्टोबर रोजी सुरु होणारी वनडे विश्वचषक स्पर्धा 2023 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी विश्वच,काचा महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाला पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) वर खेळवण्यात येणार आहे. विश्वचषक 2023 मध्ये 10 संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. यंदाचा विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. 

World Cup 2023 Schedule : विश्वचषक 2023 चं संपूर्ण वेळापत्रक

तारीखसामनाठिकाण
5 ऑक्टोबरइंग्लंड vs न्यूझीलंडअहमदाबाद
6 ऑक्टोबरपाकिस्तान vs नेदरर्लंडहैदराबाद
7 ऑक्टोबरबांगलादेश vs अफगानिस्तानधर्मशाला
7 ऑक्टोबरदक्षिण आफ्रिका vs श्रीलंकादिल्ली
8 ऑक्टोबरभारत vs ऑस्ट्रेलियाचेन्नई
9 ऑक्टोबरन्यूझीलंड vs नेदरर्लंडहैदराबाद
10 ऑक्टोबरश्रीलंका vs पाकिस्तानहैदराबाद
11 ऑक्टोबरभारत vs अफगानिस्तानदिल्ली
12 ऑक्टोबरऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिकालखनौ
13 ऑक्टोबरबांगलादेश vs न्यूझीलंडचेन्नई
14 ऑक्टोबरभारत vs पाकिस्तानअहमदाबाद
15 ऑक्टोबरइंग्लंड vs अफगानिस्तानदिल्ली
16 ऑक्टोबरऑस्ट्रेलिया vs श्रीलंकालखनौ
17 ऑक्टोबरदक्षिण आफ्रिका vs नेदरर्लंडधर्मशाला
18 ऑक्टोबरन्यूझीलंड vs अफगानिस्तानचेन्नई
19 ऑक्टोबरभारत vs बांगलादेशपुणे
20 ऑक्टोबरऑस्ट्रेलिया vs पाकिस्तानबेंगळुरु
21 ऑक्टोबरइंग्लंड vs दक्षिण आफ्रिकामुंबई
21 ऑक्टोबरनेदरर्लंड vs श्रीलंकालखनौ
22 ऑक्टोबरभारत vs न्यूझीलंडधर्मशाला
23 ऑक्टोबरपाकिस्तान vs अफगानिस्तानचेन्नई
24 ऑक्टोबरदक्षिण आफ्रिका vs बांगलादेशमुंबई
25 ऑक्टोबरऑस्ट्रेलिया vs नेदरर्लंडदिल्ली
26 ऑक्टोबरइंग्लंड vs श्रीलंकाबेंगळुरु
27 ऑक्टोबरपाकिस्तान vs दक्षिण आफ्रिकाचेन्नई
28 ऑक्टोबरनेदरर्लंड vs बांगलादेशकोलकाता
28ऑक्टोबरऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंडधर्मशाला
29 ऑक्टोबरभारत vs इंग्लंडलखनौ
30 ऑक्टोबरअफगानिस्तान vs श्रीलंकापुणे
31 नोव्हेंबरपाकिस्तान vs बांगलादेशकोलकाता
1 नोव्हेंबरन्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिकापुणे
2 नोव्हेंबरभारत vs श्रीलंकामुंबई
3 नोव्हेंबरनेदरर्लंड vs अफगानिस्तानलखनौ
4 नोव्हेंबरइंग्लंड vs ऑस्ट्रेलियाअहमदाबाद
4 नोव्हेंबरन्यूझीलंड vs पाकिस्तानबेंगळुरु
5 नोव्हेंबरभारत vs दक्षिण आफ्रिकाकोलकाता
6 नोव्हेंबरबांगलादेश vs श्रीलंकादिल्ली
7 नोव्हेंबरऑस्ट्रेलिया vs अफगानिस्तानमुंबई
8 नोव्हेंबरइंग्लंड vs नेदरर्लंडपुणे
9 नोव्हेंबरन्यूझीलंड vs श्रीलंकाबेंगळुरु
10 नोव्हेंबरदक्षिण आफ्रिका vs अफगानिस्तानअहमदाबाद
11 नोव्हेंबरइंग्लंड vs पाकिस्तानकोलकाता
11 नोव्हेंबरऑस्ट्रेलिया vs बांगलादेशपुणे
12 नोव्हेंबरभारत vs नेदरर्लंडबेंगळुरु
15 नोव्हेंबरपहिला सेमीफायनल सामनामुंंबई
16 नोव्हेंबरदूसरा सेमीफायनल सामनाकोलकाता
19 नोव्हेंबरमहाअंतिम सामनाअहमदाबाद

महत्वाच्या इतर बातम्या :

ICC World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द