ICC Test Rankings Update : यावेळी नवीन आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंच्या खराब कामगिरीनंतर आयसीसी क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. परिस्थिती अशी झाली आहे की आता टॉप 10 मध्ये फक्त टीम इंडियाचा फक्त एकच खेळाडू उरला आहे.


यावेळी आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 903 झाले आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन 813 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दरम्यान, चांगली गोष्ट म्हणजे भारताची सलामीवीर यशस्वी जैस्वाल आता एका स्थानाच्या झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी ठरली आहे. त्याचे रेटिंग आता 790 आहे.


दरम्यान, इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला एक स्थान गमवावे लागले आहे. तो आता 778 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. उस्मान ख्वाजानेही न खेळता एक स्थान वर आला आहे. तो आता सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा उदयोन्मुख फलंदाज सौद शकीलने एकाचवेळी 20 स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग थेट 724 वर गेले आहे. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनेही आठ स्थानांची प्रगती केली असून तो आता 711 च्या रेटिंगसह 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.






ऋषभ पंत आणि विराट कोहलीचे मोठे नुकसान


दरम्यान, भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची 5 स्थानांनी घसरण झाली आहे. आता तो टॉप 10 मधून बाहेर पडून थेट 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. विराट कोहलीनेही एका झटक्यात 6 स्थानावरून 688 च्या रेटिंगसह 14 व्या क्रमांकावर गेला आहे.  






हे ही वाचा -


Ind vs Nz 3rd Test : लाज वाचवण्यासाठी रोहित घेणार मोठा निर्णय; मुंबई कसोटीतून जसप्रीत बुमराह बाहेर, 'हा' खेळाडू करणार पदार्पण?


Ind vs Pak : दिवाळीत पडणार चौकार, षटकारांचा पाऊस! 1 नोव्हेंबरला भिडणार भारत-पाकिस्तान, केव्हा, कधी अन् कुठे पाहू शकता Live सामना?