ICC Mens Test Rankings 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजीत विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. लाबुशेन दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. इंग्लंडच्या जो रुटने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  तर स्मिथ तिसऱ्या आणि बाबर आझम चौथ्या क्रमांकावर आहे.  न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पाचव्या क्रमांकावर आहे. 

फलंदाजी क्रमवारी

क्रमांकखेळाडूचे नावदेशरेटिंग
1जो रुटइंग्लंड 897
2मार्नस लाबुशेनऑस्ट्रेलिया892
3स्टिवन स्मिथऑस्ट्रेलिया845
4बाबार आझमपाकिस्तान815
5केन विल्यमसनन्यूझीलंड798
6दिमुथ करुणारत्नेश्रीलंका772
7उस्मान ख्वाजाऑस्ट्रेलिया757
8रोहित शर्माभारत754
9ट्रेविस हेडऑस्ट्रेलिया744
10विराट कोहलीभारत742

गोलंदाजीत पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. कायले जेमिसनची घसरण झाली आहे. तीन अंकाने घसरुन जेमिसन सहाव्या क्रमांकावर पोहचलाय. तर जसप्रीत बुमराहच्या क्रमवारीत एका अंकाने प्रगती झाली आहे. बुमराह तिसऱ्या स्थानावर पोहचलाय.  शाहीन आफ्रिदी चौथ्या आणि रबाडा पाचव्या क्रमांकावर आहे.  

गोलंदाजी क्रमवारी 

क्रमांकखेळाडूचे नावदेशरेटिंग
1पॅट कमिन्सऑस्ट्रेलिया901
2आर अश्विनभारत850
3जसप्रीत बुमराहभारत830
4शाहीन आफ्रिदीपाकिस्तान827
5कगिसो रबाडादक्षिण आफ्रिका818
6कायले जेमिसनन्यूझीलंड796
7जेम्स अँडरसनइंग्लंड795
8नील वेगनरन्यूझीलंड762
9ट्रेन्ट बोल्टन्यूझीलंड753
10जोस हेजलवूडऑस्ट्रेलिया752

अष्टपैलू खेळाडूमध्ये भारताच्या रविंद्र जाडेजाने अव्वल स्थान कायम राखलेय. तर आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेसन होल्डर तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. 

अष्टपैलू क्रमवारी

क्रमांकखेळाडूचे नावदेशरेटिंग
1रविंद्र जाडेजाभारत385
2आर. अश्विनभारत341
3जेसन होल्डरवेस्ट विंडिज336
4शाकिब अल हसनबांगलादेश327
5बेन स्टोक्सइंग्लंड307
6मिचेल स्टार्कऑस्ट्रेलिया291
7पॅट कमिन्सऑस्ट्रेलिया263
8कॉलिन डी ग्रॅंडहोमन्यूझीलंड243
9ख्रिस वोक्सइंग्लंड230
10 कायले जेमिसनन्यूझीलंड226