ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) टेस्ट रँकिंग शनिवारी जाहीर करण्यात आली. टेस्ट रँकिंगमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कसोटी क्रमवारीत कर्णधार विराट कोहलीसह भारताचे तीन फलंदाज पहिल्या दहामध्ये आहेत. या क्रमवारीत कोहली चौथ्या, पुजारा सहाव्या आणि अजिंक्य रहाणे आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजी क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस ल्युबसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.





ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने न खेळल्यामुळे कोहलीला टेस्ट रँकिंगमध्ये फटका बसला आहे. विराट कोहली 862 गुणांसह तिसर्‍या स्थानावरुन चौथ्या स्थानी घसरला आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या केन विल्यमसनचे 919 पॉईंट्स आहेत, तर स्टीव्ह स्मिथ 891 पॉईंट्ससह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर मार्नस ल्युबसन 878 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट 823 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.


अन्य भारतीय खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा 760 पॉईंट्ससह गुणांसह सातव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी आला आहे. तर अजिंक्य रहाणेने 748 गुणांसह एका स्थानाच्या फायद्यासह आठव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 13 व्या आणि सलामीवीर रोहित शर्मा 18 व्या स्थानावर कायम आहेत.


ICC ODI Ranking: आयसीसी रँकिंगमध्ये विराट-रोहित टॉपवर कायम; जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर


ICC ODI Ranking: टॉप 5 फलंदाज

1. विराट कोहली (भारत)
2. रोहित शर्मा (भारत)
3. बाबर आजम (पाकिस्तान)
4. रॉस टेलर (न्यूझीलंड)
5. अॅरॉन फिन्च (ऑस्ट्रलिया)

ICC ODI Ranking: टॉप 5 गोलंदाज

1. ट्रेन्ट बाउल्ट (न्यूझीलंड)
2. मुजीब उर रेहमान (अफगाणिस्तान)
3. जसप्रीत बुमराह (भारत)
4. मेहंदी हसन (बांगलादेश)
5. अॅरॉन फिन्च (ऑस्ट्रेलिया)