T20 World Cup 2021: भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषकाचं अभियान २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताच्या संघात कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. विराट कोहलीनं सोमवारी भारताच्या सलामी जोडीबाबतचा खुलासा केला आहे. वॉर्म-अप सामन्यापूर्वी विराट कोहलीनं आपण सलामीला उतरणार नसल्याचं स्पष्ट केलं.  यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे.    आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मासोबत के. एल. राहुल सलामीला उतरणार असल्याचं भारतीय कर्णधार विराट कोहलीनं सोमवारी स्पष्ट केलं. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरणार आहे. इंग्लंडबरोबर झालेल्या वॉर्मअप सामन्यापूर्वी बोलताना विराट कोहली म्हणाला की, ‘नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्यात पंजाबचा कर्णधार राहुलनं चांगली फलंदाजी केली. यावेळी त्यानं धावांचा पाऊस पाडला होता. त्याचा हाच फॉर्म विश्वचषकातही दिसेल. आयपीएलआधी सर्वकाही समिकरणं वेगळी होती. मात्र, सध्याचा राहुलचा फॉर्म पाहाता त्याच्याशिवाय दुसरा चांगला पर्याय दिसत नाही. रोहित शर्मासोबत राहुल सलामीला येईल. मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल.’ 


के. एल. राहुलनं यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. ऑरेंज कॅप विजेत्या ऋतुराज गायकवाडपेक्षा राहुलच्या फक्त 9 धवाा कमी आहेत. राहुलनं 13 सामन्यात 626धावांचा पाऊस पाडला आहे. इंग्लंडविरोधात झालेल्या वॉर्मअप सामन्यातही राहुलनं आपला फॉर्म कायम राखला. राहुलनं अवघ्या 24 चेंडूंत झटपट 51धावांची खेळी केली होती. 


वॉर्म-अप सामन्यात भारताची बाजी-


सोमवारी झालेल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 विकेटनी मात केली आहे.  भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लडने भारताला 20 षटकात  189 धावांचे आव्हान दिले होते. भारताने  तीन विकेट गमावत 19 षटकात  189 धावा करत इंग्लंडवर मात केली. भारताकडून ईशान किशनने सर्वात चांगली कामगिरी केली. ईशाननंतर भारताकडून राहुलने अर्धशतकी  खेळी केली आहे. ईशान आणि राहुलने दिलेल्या योगदानामुळे भारताला हा विजय मिळवून दिला आहे. भारताकडून आज रोहित शर्माने डावाची सुरुवात केली आहे. कर्णधार कोहलीने ईशान किशन आणि केएल राहुलने ओपनिंग करण्याची संधी दिली. राहुलने सहा षटकार आणि तीन चौकारासह 51 धावा केल्या. तर ईशान किशनने सात चौकार आणि तीन षटकारासह 70 धावा केल्या आहेत. 


विश्वचषकात भारताचे सामने कधी अन् कुणाबरोबर ?



  • 24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता 

  • 31 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध न्यूझिलंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता 

  • 03 नोव्हेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अबु धाबी : संध्याकाळी 07.30 वाजता 

  • 05 नोव्हेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध B1 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता

  • 06 नोव्हेंबर (सोमवार) : भारत विरुद्ध A2 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता