ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T20 World Cup) ची स्पर्धा 2 जूनपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ अमेरिकेत दाखल होत आहे. भारतीय क्रिकेट संघाने देखील अमेरिकेत टी-20 विश्वचषकाचा सराव सुरु केला आहे.


भारत यंदाही टी-20 विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. याचदरम्यान जगभरातील अनेक माजी खेळाडूंनी टी-20 विश्वचषकात कोणते 4 संघ पोहचतील, याबाबत भविष्यवाणी केली आहे. 10 दिग्गजांनी केलेल्या भविष्यवाणी दहाही जणांनी भारताचा संघ निवडला आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आर्यंलंडविरुद्ध, तर 9 जूनला पाकिस्तानाविरुद्ध सामना होणार आहे. 


सेमीफायनलसाठी कोणी कोणते संघ निवडले?


अंबाती रायडू- भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका
ब्रायन लारा- भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान
कॉलिंगवूड- भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज
सुनील गावसकर- भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज
ख्रिस मॉरिस- भारत, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया
मॅथ्यू हेडन- भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका
अॅरोन फिंच- भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज
मोहम्मद कैफ- भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान
टॉम मूडी- भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका
एस. श्रीसंत- भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान






विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये


विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे संघाला नक्कीच काही त्रास होऊ शकतो, पण त्याचा फॉर्म पाहून भारतीय चाहते खूप खूश आहेत. IPL 2024 मध्ये विराटने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. या मोसमात तो ऑरेंज कॅपसाठीही पात्र ठरला आहे. त्याने 15 सामन्यात 741 धावा केल्या, त्याची सरासरी 61.75 आणि स्ट्राइक रेट 153 पेक्षा जास्त होता. त्याची आयपीएल कारकिर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.


टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.


विश्वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ...


अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 


कोणत्या गटामध्ये कोणते संघ


अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ