BCCI Announce Mohammed Shami Will Replace Jasprit Bumrah : अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं भारताच्या आयसीसी टी-20 विश्वचषक संघात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद शमीची (Mohammed shami) निवड केलीय. शामी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे आणि सराव सामन्यांपूर्वी ब्रिस्बेनमध्ये संघाशी संपर्क साधेल. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांचीही बॅकअप खेळाडू म्हणून संघात निवड करण्यात आलीय. हे दोघंही लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.


बीसीसीआयनं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी निवड जाहीर केली आहे. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळं टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला. यानंतर जसप्रीत बुहराहच्या जागेवर कोणत्या गोलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळेल? याकडं सर्वांचं लागलं होतं. जसप्रीत बुमराहच्या जागी संघात स्थान मिळावणाऱ्या खेळाडूंच्या शर्यतीत मोहम्मद शामीचं नाव सर्वात पुढं होतं. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनंही मोहम्मद शामीच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. जो टी-20 विश्वचषकात भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करताना दिसणार आहे. याआधी मोहम्मद शमीचा भारताच्या टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला होता.


 


ट्वीट-






 


दीपक चाहरच्या खेळण्यावर शंका
भारताच्या टी-20 विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये फलंदाज श्रेयस अय्यर, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई, वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि मोहम्मद शमी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. परंतु दीपक चाहर टी-20 विश्वचषक खेळणार की नाही? याबाबत अद्याप बीसीसीआयनं कोणतीही माहिती दिली नाही. दीपक चाहरला दुखापत झाली असून त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आलंय.


टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शामी.


हे देखील वाचा-