ICC T20 WC 2021, PAK vs AUS Preview: टी-20 विश्वचषक 2021 चा दुसरा सेमीफायनल आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई आंतराराष्ट्रीय मैदानावर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. पाकिस्तानचं नेतृत्व युवा खेळाडू बाबर आझम करीत आहे. तर, ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद आरोन फिंचकडं सोपवलं गेलंय. दोन्ही संघाकडं सक्षम खेळाडू आहेत. यामुळं आजचा सामना क्रिकेट प्रेक्षकांसाठी रंगतदार ठरणार आहे. दरम्यान, पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघानं इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिलीय. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी खेळणार आहे.
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफायनल दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.00 वाजता नाणेफेक होईल. यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 7.30 वाजता या सामन्याला सुरवात होईल. पाकिस्तान- ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी चॅनेलवर केले जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स वन एचडी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय, डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. याशिवाय, www.abplive.com वर या सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स मिळवता येणार आहेत.
संघ-
पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद नवाज, हैदर अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, सर्फराज अहमद
ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, अॅश्टन अगर, मिचेल स्वीपसन , जोश इंग्लिस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Jimmy Neesham: न्यूझीलंडच्या जिमी नीशमची थेट एमएस धोनीशी तुलना, सेमीफायनलमधील 'या' दृष्यांनी वेधलं सर्वांच लक्ष
- T20 World Cup 2021, 2nd Semifinal, Pakistan vs Australia: सेमीफायनलपूर्वी पाकिस्तानची धाक-धूक वाढली, मॅच विनर खेळाडूंची प्रकृती बिघडली
- PAK vs AUS : पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलिया रोखणार का? आज दुसरा उपांत्य सामना