ICC T20 WC 2021, ENG vs AUS: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर आक्रमक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला केवळ 125 धावांवर रोखले. त्यानतंर इंग्लंडच्या संघाकडून या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलामीवीर जॉस बटलरने नाबाद 71 धावांची खेळी केली. ज्यामुळे इंग्लंडच्या संघाने 11.4 षटकात हा सामना जिंकला. 


SA vs SL: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर चार गडी राखून विजय


नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून डेव्हिड वॉर्नर (2 बॉल 1 धाव), आरोन फिंच (49 बॉल 44 धावा), स्टीव्हन स्मिथ (5 बॉल 1 धाव), ग्लेन मॅक्सवेल (9 बॉल 6 धावा), मार्कस स्टॉइनिस (4 बॉल 0), मॅथ्यू वेड (18 बॉल 18), पॅट कमिन्स (3 बॉल 12 धावा), अॅश्टन अगर (20 बॉल 20), मिचेल स्टार्क (6 बॉल 13 धावा) आणि अॅडम झम्पाने 4 बॉल 1 धाव केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकात 10 विकेट्स गमावून 125 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेच्या संघाकडून क्रिस जॉर्डनने 3 विकेट्स पटकावल्या. क्रिस वोक्स आणि टायमल मिल्स यांना प्रत्येकी दोन-दोन तर, आदिल रशिद आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवता आली. 


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडच्या संघाकडून सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. जेसन रॉय (20 बॉल 22 धावा), जॉस बटलर (32 बॉल 71 धावा), डेविड मलान (8 बॉल 8) आणि जॉनी बेअरस्टोने 11 बॉल 16 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडला 11.4 षटकातच ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने विजय मिळवता आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून अॅश्टन अगर आणि अॅडम झम्पा यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली. 


या विजयासह इंग्लंडचे 6 गुण झाले असून ते उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या अगदी जवळ आहे. फॉर्मात असलेला इंग्लंड संघ सहा गुणांसह गट 'अ' गुणतालिकेत शीर्षस्थानी पोहोचला आहे. त्याचा रनरेट  +3.95 वर पोहोचला आहे. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ  -0.627 रनरेटसह दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचे सध्या 4 गुण आहेत.