ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतील (ICC T20 World Cup 2024) 9 वा सामना पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युगांडाने पापुआ न्यू गिनीचा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. या सामन्यात युगांडाच्या 43 वर्षीय फ्रँक एनसुबुगाने विश्वविक्रम करत इतिहास रचला आहे. 


एनसुबुगाने घेतल्या दोन विकेट्स


वयाच्या 43 व्या वर्षी फ्रँक एनसुबुगाने त्याच्या पहिल्या T20 विश्वचषक सामन्यात शानदार गोलंदाजी केली. केवळ 4 धावा दिल्या आणि 1.00 च्या इकॉनॉमीसह 2 विकेट्स घेतल्या. एनसुबुगा हा फिरकी गोलंदाज आहे. त्याने पापुआ न्यू गिनीचे दोन महत्त्वाचे फलंदाज हिरी हिरी आणि चार्ल्स अमिनी यांना आपले बळी बनवले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे युगांडाने पापुआ न्यू गिनीचा अवघ्या 77 धावांत पराभव केला.


एनसुबुगा विश्वविक्रम केला नावावर-


फ्रँक एनसुबुगा व्यतिरिक्त, T20 विश्वचषक 2024 च्या 9व्या सामन्यात, युगांडाच्या आणखी एका खेळाडूने आपल्या चांगल्या एकोनॉमीच्या गोलंदाजीने या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा ओटनील बार्टमन हा टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम एकोनॉमीचा गोलंदाज होता. पण आता युगांडाच्या फ्रँक एनसुबुगाने या स्थानावर आपले स्थान निर्माण केले आहे.






युगांडा प्रथमच T20 विश्वचषक खेळत आहे-


पहिला T20 विश्वचषक 2007 मध्ये खेळला गेला. T20 विश्वचषक 2024 सह या स्पर्धेची ही 9वी आवृत्ती आहे. याआधी युगांडा कधीही टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला नव्हता. पण युगांडाने टी-20 विश्वचषकाच्या 9व्या आवृत्तीत पात्रता मिळवली आणि युगांडाच्या संघासाठी ही पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा आहे.


युगांडाने पहिल्या T20 विश्वचषकात पहिला विजय मिळवला


T20 विश्वचषक 2024 च्या 9व्या सामन्यापर्यंत युगांडाने दोन सामने खेळले आहेत. युगांडाचा पहिला सामना T20 विश्वचषक 2024 मधील 5 वा सामना होता. युगांडाचा हा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होता. जो अफगाणिस्तानने 125 धावांनी जिंकला. युगांडाचा दुसरा सामना T20 विश्वचषक 2024 चा 9वा सामना होता, जो पापुआ न्यू गिनी विरुद्ध खेळला गेला. या सामन्यात युगांडाने पापुआ न्यू गिनीचा 3 गडी राखून पराभव केला. युगांडाचा टी-20 विश्वचषकातील हा पहिला विजय आहे.


गुणतालिकेत युगांडा तिसऱ्या क्रमांकावर-


क गटात अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, युगांडा, पापुआ न्यू गिनी, न्यूझीलंड यांचा समावेश आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी 1 सामना खेळला आहे, तर युगांडा आणि पापुआ न्यू गिनी यांनी प्रत्येकी 2 सामने खेळले आहेत, परंतु न्यूझीलंडने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. अफगाणिस्तान एक सामना जिंकून आणि +6.250 च्या नेटरन रेट 2 गुणांसह गट क च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. वेस्ट इंडिजनेही एक सामना खेळून जिंकला आहे. यासह वेस्ट इंडिज दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे दोन स्कोअर आहेत, परंतु नेटरन रेट +0.411 आहे. युगांडाने 2 पैकी एक सामना जिंकला आहे. युगांडा गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचेही 2 गुण आहेत. तर नेटरन रेट -2.952 आहे. पापुआ न्यू गिनीने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. यासह, पापुआ न्यू गिनी शून्य गुणांसह आणि -0.434 च्या नेटरन रेटने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याचे पॉइंट टेबलवर खाते अद्याप उघडलेले नाही.


संबंधित बातमी:


T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; कोणत्या ग्रुपमध्ये, कोण अव्वल?, जाणून घ्या!