World Cup 2023 Points Table : धरमशालाच्या मैदानावर भारताने न्यूझीलंडचा विजयरथ रोखला आहे. भारताने न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव करत विश्वचषकात सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे. या विजयासह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. भारताविरोधातील पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. न्यूझीलंड संघाचे पाच सामन्यात चार विजय आणि एक पराभव झालाय. भारताने संघाने आपल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. 


विराट कोहलीच्या शानदार 95 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा विजयरथ रोखला. भारताचा हा विश्वचषकातील पाचवा विजय होय. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या संघानंतर आता न्यूझीलंडचाही भारताने पराभव केला. धरमशालाच्या मैदानावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत 20 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला. 


सर्वाधिक धावा विराटच्या नावावर - 


यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. पाच सामन्यात विराट कोहलीने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. विराट कोहलीने पाच सामन्यात 118 च्या सरासरीने 354 धावा चोपल्या आहेत. रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 5 सामन्यात 62.20 च्या सरासरीने 311 धावा चोपल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद रिझवान आहे. त्याने 294 धावा केल्या आहेत. रचित रविंद्र आणि ड्ररेल मिचेल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नावावर अनुक्रमे 290 आणि 268 धावा आहेत. 


गोलंदाजीत मिचेल सँटनर 12 विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर जसप्रीत बुमराह 11 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. मधुशंकाच्या नावावरही 11 विकेट आहेत. मॅट हेनरीने 10 विकेट घेतल्या आहेत.


गतविजेत्यांची अवस्था दैयनीय -


अफगाणिस्तानचा संघ सध्या तळाला आहे. चार सामन्यात तीन पराभव स्विकारावे लागणाऱ्या अफघाणिस्तान संघाचा नेटरनर सर्वात खराब आहे. इंग्लंड संघाचेही चार सामन्यात तीन पराभव झाले आहेत. गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत दोन गुणांसह नवव्या स्थानावर विराजमान आहे. गतविजेता इंग्लंडचा संघाची यंदाच्या विश्वचषकात दैयनीय अवस्था झाली आहे. इंग्लंडला चार सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे


पाकिस्तानची घसरण - 


शुक्रवारी ऑस्ट्रेलियाकडून 62 धावांनी पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाची गुणतालिकेत घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या संघाची चौथ्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर पोहचला आहे.  पाकिस्तान संघाने चार सामन्यात दोन पराभव आणि दोन विजय झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचेही चार सामन्यात चार गुण झाले आहेत. पण सरस रनरेटमुळे ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहे.


तळाच्या संघाची स्थिती काय ?


इंग्लंडच्या संघाला पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. इंग्लंडच्या संघाच्या सहाव्या क्रमांकावरुन नवव्या स्थानी घसरण झाली आहे. बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानी पोहचला आहे. तर सातव्या क्रमांकावर नेदरलँड आणि आठव्या स्थानी श्रीलंका हे संघ आहेत. बांगलादेश, नेदरलँढ, श्रीलंका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघाने आपापल्या चार सामन्यात तीन पराभव स्विकारले आहेत. 


आणखी वाचा :


भारताची विजयादशमीआधी विजयपंचमी, न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव, विराट कोहलीची 95 धावांची झुंजार खेळी