ICC Mens ODI Rankings 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा बोलबाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इमाम - उल हकने बाजी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबार आणि इमाम यांनी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्यामुळेच त्यांना क्रमावारीत फायदा झाल्याचे दिसतेय. दुसरीकडे भारताचे माजी आणि आजी कर्णधार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत. विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहा जणामध्ये भारत आणि पाकिस्तान संघाचे प्रत्येकी दोन दोन खेळाडू आहेत. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक आहे. 






गोलंदाजीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये भारताचा एकमेव गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ट्रेंट बोल्ट आहे तर दुसऱ्या क्रमांकावर जोस हेजलवूड आहे. मॅट हेन्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या दहा अष्टपैलू खेळाडूमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. बांगलादेशचा शाकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दिसर्या स्थानावर आहे. 


टी - 20 क्रिकेट भारतीय खेळाडूंची कामगिरी सन्माजनक नसल्याचे दिसतेय. कारण गोलंदाजी, फलंदाजी  आणि अष्टपैलू यामध्ये अव्वल दहा खेळाडूमध्ये फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेस आहे. भारताकडून इशान किशन एकमेव खेळाडू आहे. फंलदाजीत इशान किशन सहाव्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल दहामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.  






कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजीत विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. लाबुशेन दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. इंग्लंडच्या जो रुटने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  तर स्मिथ तिसऱ्या आणि बाबर आझम चौथ्या क्रमांकावर आहे.  न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पाचव्या क्रमांकावर आहे.