ICC World Cup 2023, IND vs AUS: 19 नोव्हेंबर 2023 ला प्रत्येक भारतीयाच्या मनावर झालेले आघात आजही ताजे आहेत. तो दिवस देशातील कोणतीच व्यक्ती, कधीच विसरू शकणार नाही. याच दिवशी गुजरातमधील (Gujarat) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) टीम इंडिया (Team India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात वर्ल्डकप 2023 (ICC World Cup) चा अंतिम सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाच वर्ल्डकप (World Cup 2023) ट्रॉफी उंचावणार हे प्रत्येक भारतीयानं मानत अगदी पक्क केलेलं, पण चतुर कांगारुंनी मोठ्या शिताफिनं टीम इंडियाला नमवलं आणि देशातील 140 कोटी लोकांचा हिरमोड झाला. आज त्या घटनेला तब्बल 19 दिवस उलटलेत. याच अंतिम सामन्याबाबत एक मोठा रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये टीम इंडिया अंतिम सामन्यात पराभूत होण्याचं कारण सांगण्यात आलं आहे. 


गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवण्यात आला. ज्या खेळपट्टीवर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळला होता, त्या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) 'सरासरी' रेटिंग दिलं आहे. यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या पराभवाचं कारण सांगताना खेळपट्टीला जबाबदार धरलं होतं. 


'टाईम्स ऑफ इंडिया'नुसार, आयसीसीनं पाच विश्वचषक सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिलं आहे, ज्यामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचाही समावेश आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं सर्वात आधी प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 240 धावा केल्या. टीम इंडियाचं आव्हान स्विकारत मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं 43 षटकांत लक्ष्य गाठलं आणि विजय मिळवला. 


राहुल द्रविडनं खेळपट्टीवरच फोडलेलं पराभवाचं खापर 


बीसीसीआयच्या आढावा बैठकीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही अंतिम सामना गमावल्याबद्दल खेळपट्टीला जबाबदार धरलं होतं. रिपोर्ट्सनुसार, मुख्य प्रशिक्षक म्हणाले होते की, आम्हाला अपेक्षेप्रमाणे टर्न न मिळाल्यानं आम्ही हरलो. स्पिनर्सना योग्य तो स्पिन मिळाला असता, तर आपणच जिंकलो असतो. या रणनीतीनंच आम्ही पहिले 10 सामने जिंकलेत, पण अंतिम फेरीत मात्र ही रणनिती कामी आली नाही.  


खेळपट्टी खराब मग ऑस्ट्रेलियानं शानदार खेळी कशी केली? 


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयसीसीनं नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पीचला सरासरी रेटिंग देत खेळपट्टी 'चांगली' नसल्याचं स्पष्टच केलं आहे. मग आता सर्वांच्या मनात प्रश्न येतोय की, खेळपट्टी खराब असल्यामुळे टीम इंडिया ढेपाळली, तर मग ऑस्ट्रेलियानं चांगली खेळी कशी केली? तर, त्यासाठी पूर्णपणे जबाबदार ठरला तो टॉस. खराब खेळपट्टीवर टीम इंडियानं टॉस गमावला आणि तिथेच वर्ल्डकपही गमावला. 


ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून सर्वात आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला 240 धावांवर थोपवलं. ऑस्ट्रेलियानं सर्वात आधी गोलंदाजी केल्यामुळे दिवसा खेळपट्टीनं त्यांना काही प्रमाणात साथ दिली. पण भारतीय क्रिकेट संघ गोलंदाजी करायला आला तोपर्यंत अंधार पडला होता आणि लाईट्स लागल्या होत्या. त्यासोबतच मैदानावर काही प्रमाणात दवही पडलं होतं. अशा परिस्थितीसमोर टीम इंडियाचे भेदक गोलंदाज काहीच करू शकले नाहीत. आपल्या सर्वांच्याच स्वप्नांचा चक्काचूर झाला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pakistan Tour of Australia: पाकिस्तानच्या सामन्यात LIVE टिव्हीवर अचानक दिसलं असं काही, की गोंधळच झाला!