International Cricket Calendar 2022-27: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं (ICC) 2022-27 या कालावधीसाठी पुरूषांच्या फ्यूचर टूर प्रोग्रामची (ICC Men's Future Tours Program)  यादी जाहीर केलीय. आयसीसीनं जाहीर केलेल्या पुढील चार वर्षांच्या एफटीपी कार्यक्रमात सर्व क्रिकेट संघाच्या सर्व प्रकरातील कार्यक्रमाचा समावेश आहे. ज्यात एकूण 777 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा (173 कसोटी, 281 एकदिवसीय आणि 323 टी-20 सामने) समावेश आहे. आयसीसीच्या मागच्या एफटीच्या तुलनेत यंदा 83 सामने अधिक खेळवले जाणार आहेत. दरम्यान, इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघाचाही सर्वाधिक सामने खेळणारा संघाच्या यादीत समावेश केला जातो. यामुळं आयसीसीच्या एफटीनुसार, भारतीय संघाच्या सामन्यातही वाढ झालीय.


ट्वीट-



भारताचं वेळापत्रक
आयसीसीच्या नव्या एफटीपीनुसार, भारत पुढील चार वर्षात 38 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 61 टी-20 सामने खेळणार आहे. महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघ 27 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या कार्यक्रम चक्रात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पाच-पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळअलण्याची ही 30 वर्षांतील पहिलीच वेळ असेल. यापूर्वी 1992 मध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त भारत आणि इंग्लंडदरम्यानही पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं गेल्या काही काळात क्रिकेटमध्ये खूप प्रगती केलीय. यापुढंही भारत अशीच कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे.


इंग्लंडचा संघ खेळणार सर्वाधिक कसोटी सामने
आयसीसी एफटीफीनुसार, इंग्लंडचा संघ सर्वाधिक म्हणजेच एकूण 22 कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, जे 21 कसोटी सामने खेळणार आहेत. तर, भारतीय संघ 20 कसोटी सामने खेळणार आहे. द्वीपक्षीय मालिकेव्यतिरिक्त चार वर्षीय एफटीपीच्या कार्यक्रमादरम्यान आयसीसी विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफीचा एक-एक हंगामही खेळला जाणार आहे. तर, टी-20 विश्वचषक आणि जागतिक कसोटी अंतिम सामन्याचे दोन हंगाम पार पडतील. 


आयसीसीच्या एफटीपीत मोठ्या स्पर्धांचा समावेश
आयसीसीच्या नव्या एफटीपीत  मोठ्या स्पर्धांचाही समावेश करण्यात आलाय. ज्याची सुरुवात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापासून होईल. त्यानंतर 2024 चा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे खेळवले जातील. याशिवाय, 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तामध्ये, 2025 चा टी-20 विश्वचषक भारतात आणि 2027 चा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे विश्वचषक आयोजित केला जाईल. यावरून स्पष्ट दिसते की येणारा एफटीपी अधिक बिझी असेल.


हे देखील वाचा-


IND vs ZIM: शिखर धवनसोबत सलामीला कोणाला पाठवावं? मोहम्मद कैफनं सुचवलं धाकड फलंदाजाचं नाव!


Asia Cup 2022: आशिया चषकात रोहित शर्माकडं मोठ्या विक्रमाची संधी, फक्त 117 धावा दूर