मुंबई : भारतीय क्रिकेट संघात आता नव्या दमाचे अनेक खेळाडू आहेत. मैदानावर पाय ठेवताच धावांचा पाऊस पाडण्याची ताकद अनेक नव्या खेळाडूंमध्ये आहे. काही खेलाडूंनीही तर त्यांची ही शक्ती प्रत्यक्षपणे दाखवलेली आहे. यामध्ये नितीश कुमार या धडाडीच्या खेळाडूचे नाव प्राधान्यक्रमाने घ्यावे लागेल. त्याने ऑस्ट्रेलियात पहिल्याच सामन्यात जोरदार शतक झळकावले होते. मात्र आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवूनही त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाच्या भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. 

नितीश कुमारला संघात स्थान नाही

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या संघात अनेक अनुभवी खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले आहे. यशस्वी जैस्वालसारख्या तरूण खेळाडूलाही संघात स्थान मिळालं आहे. मात्र त्याच्यासारख्याच धडाडीच्या नितीश कुमार मात्र या संघात स्थान देण्यात आलेले आहे. तो भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या टीमचा भाग नसणार आहे. जेव्हा-जेव्हा संधी मिळाली, तेव्हा-तेव्हा नितीश कुमारने त्याचं शौर्य दाखवलेलं आहे. 

ऑस्ट्रेलियात मैदान गाजवलं, दिल्लीही केली सर

विशेष म्हणजे नितीश कुमार हा अष्टपैलू खेळाडू आहे. गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोज त्याने ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील मैदानात जोरदार खेळ करून दाखवला होता. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले होते. हे शतक करून तो ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यांत शतक ठोकणारा तिसरा सर्वांत तरूण भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. याआधी ऑक्टोबर महिन्यातही भारत आणि बांग्लादेश यांच्यातील टी-20 सामन्यात दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर नितीश कुमार रेड्डीने तुफान खेळू केली होती. त्याने अवघ्या 34 चेंडंत तब्बल 74 धावा केल्या होत्या.

एकूण 15 सामने होणार

त्याची हीच कामगिरी पाहता नितीश रेड्डीला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. काहीही झालं तर नितीशला संघात घेतलंच जाईल, असा अंदाज क्रिकेटचे चाहते व्यक्त करत होते. मात्र हा अंदाज चुकला असून तो चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग नसेल. दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या 19 फ्रेब्रुवारीपासून चालू होत आहे. या ट्रॉफीत एकूण आठ संघ एकमेकांना भिडणार असून एकूण 15 सामने खेळवले जातील.  

हेही वाचा :

Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!

India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?