Geoff Allardice Steps Down as ICC CEO : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील महिन्यात 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी यजमान पाकिस्तान जोरात तयारीत व्यस्त आहे. पण, दरम्यान आयसीसीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण म्हणजे सीईओ म्हणून नियुक्त केलेले ज्योफ ॲलार्डिस (Geoff Allardice) यांनी राजीनामा दिला आहे. ॲलार्डिस गेल्या चार वर्षांपासून या भूमिकेत पूर्णवेळ काम करत होतो, पण आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीनेही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
ज्योफ ॲलार्डिस यांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणे माझ्यासाठी एक सन्मान आहे. क्रिकेटची जागतिक व्याप्ती वाढवण्यापासून ते आयसीसी सदस्यांसाठी पाया निर्माण करण्यापर्यंत, आम्ही जे काही साध्य केले आहे त्याचा मला अविश्वसनीय अभिमान आहे. मला अभिमान आहे की मी आयसीसीमध्ये निवडून आलो. गेल्या 13 वर्षांपासून मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मी आयसीसी अध्यक्ष, संचालक मंडळ आणि संपूर्ण क्रिकेट समुदायाचे आभार मानू इच्छितो. मला वाटते की पद सोडण्याची आणि नवीन जबाबदारी स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. मला खात्री आहे की क्रिकेटसाठी पुढे रोमांचक काळ असेल आणि मी आयसीसी आणि वर्ल्ड क्रिकेट समुदायाला भविष्यात यश मिळो अशी शुभेच्छा देतो."
जेफ अॅलार्डिस यांनी अचानक का दिला आयसीसीच्या सीईओ पदाचा राजीनामा ?
आयसीसीच्या सीईओ पदावरून ज्योफ यांनी अचानक राजीनामा देण्यामागील कारण अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही, परंतु गेल्या वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन हे ज्योफ यांच्या अचानक राजीनाम्यामागील कारण असल्याचे मानल्या जात आहे. आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत बोर्ड सदस्यांना स्पष्ट चित्र सादर करू न शकल्यामुळे त्यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला.
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत आणि पाकिस्तानने अद्याप स्टेडियमचे बांधकामही पूर्ण केलेले नाही. आयसीसीने अॅलार्डाईसला चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते, जे त्याने सादर केले नाही.
सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर, जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यापासून जेफ अॅलार्डिसवर खूप दबाव होता. सलग दोन आयसीसी स्पर्धांबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. आयसीसी आता जेफ अॅलार्डिसच्या उत्तराधिकारीचा शोध प्रक्रिया सुरू करेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल.
हे ही वाचा -