ICC Awards Indian Cricketers न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाला बुस्टर डोस मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं विशेष पुरस्कार दिले आहेत.आयसीसीनं (ICC) नं आंतरराष्ट्रीय टी-20  क्रिकेटमध्ये रँकिंगमध्ये असलेल्या पहिल्या स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवला आयसीसी मेन्स टी-20 आय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दीर्घ काळापासून टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादव शिवाय अन्य भारतीय खेळाडूंना देखील आयसीसीनं पुरस्कार दिले आहेत. 


सूर्यकुमार यादवला क्रिकेटर ऑफ द ईयर याशिवाय  'टी20 आय टीम ऑफ द ईयर कॅप' देखील मिळाली. याशिवाय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला देखी टी-20 टीम ऑफ द ईयर कॅप देण्यात आली. याशिवाय भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला 'टेस्ट टीम ऑफ द ईयर कॅप ' देण्यात आली. राहुल द्रविडच्या हस्ते रविंद्र जडेजाला कॅप देण्यात आली. 


रोहित शर्मा, शुभमन गिल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज ला आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर कॅफ देण्यात आली.  


आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत प्रथमस्थानी


भारताचं टी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व आहे. भारतीय क्रिकेट संघ 264 च्या रेटिंगसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. यापर्वी देखील भारत पहिल्या स्थानावर होता.  


टी20 वर्ल्ड कपची सुरुवात 1 जूनपासून सुरु होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपची पहिली मॅच अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. भारताची पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार आहे. गट अ मध्ये भारताशिवाय अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयरलँड आहेत.  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 9 जूनला, भारत आणि अमेरिका 12 जून, भारत आणि कॅनडा यांच्यातील मॅच 15 जूनला  होणार आहे. भारताच्या पहिल्या तीन मॅचेस न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. तर, भारताची चौथी मॅच फ्लोरिडात होणार आहे.  


भारत 17 वर्षानंतर विजेतेपद मिळवणार?


भारतीय संघानं 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करत विजय मिळवला होता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वातील भारताचा प्रवास सर्वांना आश्चर्याचा धक्का  देणारा ठरला होता. भारताला 2007 नंतरच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा विजेतेपद मिळवता आलेलं नाही. 17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ इतिहास रचणार का हे पाहावं लागणार आहे.


संबंधित बातम्या :


IND vs PAK ISIS Threat: मोठी बातमी, भारत-पाकिस्तान मॅचमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, इसिसकडून धमकी


Hardik Pandya : हार्दिक टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेत दाखल, घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना नताशाची दोन शब्दांची पोस्ट चर्चेत...