ICC Cricket World Cup 2023: रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वातील भारतीय संघ विश्वचषकात (Word Cup 2023) भन्नाट फॉर्मात आहे. आतापर्यंत भारतीय संघ अजेय आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिाक आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांचा पराभव करत भारताने गुणतालिकेत (WC Points Table) अव्वल स्थान पटकावले आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भारताने आफ्रिकेचा लाजीरवाणा पराभव केला. भारताने २४३ धावांनी आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव केला. आता साखळी फेरीत टीम इंडिया नेदरलँड्सविरुद्धच मैदानात उतरेल, या सामन्यातही भारतचा विजय निश्चित मानला जातोय.   ऑस्ट्रेलियापासून (AUS vs IND) दक्षिण आफ्रिकेपर्यंत कोणत्याही संघाला या विश्वचषकात टीम इंडियाला पराभूत करता आलेले नाही. भारताचा विजयरथ रोखणं सहजासहजी शक्य नसल्याचे दिसतेय. विश्वचषकात भारतीय संघाला (IND in World Cup) कसे रोखायचं ? हा प्रश्न इतर नऊ संघासोबत क्रिकेट खेळणाऱ्या सर्वांनाच पडलाय. याचीच चर्चा पाकिस्तानमध्ये एका वृत्तवाहिनीवर झाली. 


वसीम अक्रमने सांगितले भारताला कसे पराभूत करु शकतो ?


सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात भारतीय संघाला कसे रोखायचे? याचा विचार जगभरातील हे दिग्गज करत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम, मोईन खान, मिसबाह-उल-हक आणि शोएब मलिक पाकिस्तानी वाहिनीवर याबाबत चर्चा करत होते. या चर्चेत एका दर्शकाने या विश्वचषकात भारतीय संघाला कसे रोखले जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या उत्तरात स्विंगचा बादशाह वसीम अक्रम म्हणाला, तुम्ही त्याची बॅट चोरा किंवा शूज चोरा. तेव्हाच ते सामना गमावतील. वसीम अक्रमच्या या उत्तरावर सर्वजण हसू लागले. वसीम अक्रमचे हे वक्तव्य आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. 


पाहा व्हायरल व्हिडीओ - 



भारताचा विराट विजय -


रविवारी भारताने दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव करत आठवा विजयाची नोंद केली.  या विश्वचषकात भारतानंतरचा सर्वात यशस्वी संघ दक्षिण आफ्रिका होता, जो अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी करत होता. पण भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी आणि  फलंदाजी अतिशय कमकुवत जाणवत होती. त्यामुळेच त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला.  या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 326 धावा केल्या.  त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 83 धावांत ऑलआउट केले. आता उपांत्य फेरीत भारत कोणत्या संघाविरुद्ध मैदानात उतरतो आणि कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.