IPL 2026 Auction Update News : इंडियन प्रीमियर लीग 2026 साठी (IPL 2026 Auction) होणाऱ्या मिनी ऑक्शनकडे सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे. नव्या हंगामात उतरण्यापूर्वी सर्व 10 संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली असून, आता संघांच्या उणिवा भरून काढण्यासाठी मिनी ऑक्शनमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
मंगळवार, 16 डिसेंबर रोजी अबू धाबीतील एतिहाद स्टेडियममध्ये (Abu Dhabi on December 16) हा बहुचर्चित मिनी ऑक्शन पार पडणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील, त्यामुळे प्रत्येक फ्रँचायझीची रणनीती निर्णायक ठरणार आहे.
237.55 कोटींची बोली, 77 जागांसाठी 359 खेळाडू मैदानात!
या लिलावासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण 237.55 कोटी रुपयांचा पर्स उपलब्ध आहे. मिनी ऑक्शनमध्ये कमाल 77 खेळाडू खरेदी करता येणार असून, एकूण 359 खेळाडू लिलावात उतरले आहेत. यापैकी जास्तीत जास्त 31 परदेशी खेळाडूंनाच करार मिळू शकतो, तर लिलावात 110 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल 2026 मिनी ऑक्शनपूर्वी प्रत्येक संघाकडे उरलेला पर्स किती आहे, तसेच अजून किती खेळाडू संघात घ्यायचे आहेत, यावरून कोणता संघ किती आक्रमक खेळी करतो, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
कोणत्या संघाकडे किती पैसे?, IPL लिलावापूर्वी जाणून घ्या सर्वकाही
कोलकाता नाईट रायडर्स (KKR पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 13पर्स बॅलन्स - 64.3 कोटी रुपये
चेन्नई सुपर किंग्ज (CSK पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 9पर्स बॅलन्स - 43.4 कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद (SRH पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 10पर्स बॅलन्स - 25.5 कोटी रुपये
लखनऊ सुपर जायंट्स (LSG पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 6पर्स बॅलन्स - 22.95 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स (DC पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 8पर्स बॅलन्स - 21.8 कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 5पर्स बॅलन्स - 16.4 कोटी
राजस्थान रॉयल्स (RR पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 9पर्स बॅलन्स - 16.05 कोटी
गुजरात टायटन्स (GT पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 6पर्स बॅलन्स - 12.9 कोटी
पंजाब किंग्ज (PBKS पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 4पर्स बॅलन्स - 11.5 कोटी
मुंबई इंडियन्स (MI पर्स बॅलन्स 2026)उर्वरित स्लॉट्स - 5पर्स बॅलन्स - 2.75 कोटी
हे ही वाचा -