Anil Chaudhary Umpire: भारतीय पंच अनिल चौधरी (Umpire Anil Chaudhari) यांनी शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) अनिल चौधरी यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. रोहित शर्मा खूप हुशार खेळाडू असल्याचं अनिल चौधरी यांनी म्हटलं आहे.
रोहित शर्मासारख्या (Rohit Sharma) खेळाडूविरुद्ध अंपायरिंग करणे सर्वात सोपे असते. एकतर तो आऊट असो किंवा नॉट आउट. तो हळू-हळू खेळत नाही. त्याचा फूटवर्क खूप चांगला आहे आणि तो चेंडूला पुढे जाऊन मारण्यापेक्षा त्याची वाट पाहतो. त्याला चेंडूची उत्तम जाण आहे. ज्या दिवशी रोहित त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो वन मॅन आर्मी असतो, असं अनिल चौधरींनी सांगितले.
किती पगार मिळतो?
अनिल चौधरी (Anil Chaudhari) यांनी पंचांच्या पगाराबाबतही खुलासा केला आहे. आयसीसीचा पंचांसोबत वार्षिक करार असतो. जर तुम्ही अंपायरिंग करण्यासाठी तंदुरुस्त नसाल, तरीही पैसे दिले जातात. सध्यातरी बीसीसीआयचा पंचासोबत करार तरी नाही. आम्ही जेवढ्या सामन्यात अंपायरिंग करतो,त्यानूसार पैसे मिळतात. तसेच प्रत्येक देशाचा आंतरराष्ट्रीय पॅनल असतो. पंचांच्या रँकिंगच्या A+ श्रेणीमध्ये, दहा पंच आहेत, जे प्रति सामना 40 हजार कमावतात. यादीत नितीन मेनन, अनिल चौधरी, जेआर मदनगोपाल, आणि नवदीप सिंग सिद्धू आणि इतर 5 पंच आहेत.
एमएस धोनीवर काय म्हणाले?
अनिल चौधरी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीवर (MS Dhoni) देखील भाष्य केलं आहे. डीआरएस (DRS) नियमाला अनेकजण 'धोनी रिव्ह्यू सिस्टम' असं बोलतात. मैदानात खेळताना जेव्हा कधी महेंद्रसिंग धोनी डीआरएसची मागणी करतो तेव्हा तो चुकीचा असण्याची शक्यता फारच कमी असायची. धोनीच्या याच अचूकतेमुळे चाहत्यांनी डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टम असं नाव दिलं आहे. पण भारतीय कर्णधार अनिल चौधरी यांनी डीआरएसच्या बाबतीत धोनी अचूकतेच्या फार जवळ असतो, पण तो नेहमीच बरोबर असतो असं नाही, असं अनिल चौधरी यांनी सांगितले. धोनी नेहमीच योग्य असतो असं काही नाही. अनेकदा गोष्टी वेगळ्या पद्धतीने असतात. तो अचूकतेच्या फार जवळ असतो. त्याच्याकडे खेळासंबंधी अनेक आयडिया आहेत, असंही अनिल चौधरी यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.
संबंधित बातम्या:
6 षटकांत तब्बल 113 धावा चोपल्या...; 9 षटकांत खेळ संपवला, पुन्हा 'हेड' नडला, ऑस्ट्रेलियाचा भीमपराक्रम