AUS vs SCO 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 7 विकेट्स राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने निर्धारित 20 षटकांत 154 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 62 चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवला. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 25 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियासाठी जोरदार पाऊस पाडला. तसेच मिचेल मार्शने देखील 39 धावांची आक्रमक खेळी केली.
सामना कसा राहिला?
पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यजमान संघाकडून सर्वाधिक धावा जॉर्ज मुनसेने 28 धावा केल्या. तर संघाचा कर्णधार रिची बेरिंग्टनने 23 आणि मॅथ्यू क्रॉसने 37 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवर जेक फ्रेझर मॅकगर्कला चांगली खेळी करता आली आहे. जेक फ्रेझर मॅकगर्क झटपट बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्शने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्शने चौकर-षटकारांचा पाऊस पाडला. स्कॉटलंडने दिलेल्या 155 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 58 चेंडूतच पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाने 6 षटकांत 133 धावा चोपल्या...
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या तिसऱ्या चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्कची विकेट पडली. यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी कमान सांभाळली. या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या अवघ्या 6 षटकांत 113 धावांवर नेली. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. मिचेल मार्च पॉवरप्लेनंतर पुढच्याच चेंडूवर 39 धावा करत बाद झाला. तर ट्रॅव्हिस हेडसोबत मिचेल मार्शने अवघ्या 33 चेंडूत 113 धावा केल्या.
ट्रॅव्हिस हेडचे वादळ-
ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत तो आता मार्कस स्टॉइनिसच्या बरोबरीत पोहोचला. ट्रॅव्हिस हेडने 25 चेंडूत 80 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 12 चौकार आणि 5 षटकार टोलावले. दुसरीकडे, मिचेल मार्शने आपल्या डावात केवळ 12 चेंडूंचा सामना केला. मात्र या छोट्या खेळीत मिचेल मार्शने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले.
संबंधित बातम्या:
विराट कोहलीपासून MS धोनीपर्यंत, कोणत्या क्रिकेटपटूने किती Tax भरला?; 66 कोटी रुपये कोणी दिले?, पाहा