Mangoliya vs Singapur T20 Match: टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये विविध विक्रम रचत असतात. एका षटकांत सहा षटाकर देखील टी-20 मध्ये पाहायला मिळाले. तसेच 20 षटकांत 300 धावांचा टप्पा देखील अनेक संघांनी ओलांडला आहे. याचदरम्यान आता एक नवीन विक्रम टी-20 फॉरमॅटमध्ये नोंदवला गेला आहे.
मंगोलिया आणि सिंगापूर (Mangoliya vs Singapur) यांच्यात आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मंगोलियाचा संपूर्ण संघ केवळ 10 धावांवर बाद झाला. सिंगापूरच्या संघाने डावातील पहिल्या षटकांच्या पाच चेंडूंचा सामना करत सामन्यात विजय मिळवला. मंगोलियाकडून फक्त दोन फलंदाजांनी सर्वाधिक दोन धावा केल्या.
सामन्यात नेमकं काय घडलं?
मंगोलिया आणि सिंगापूर यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हा आश्चर्यकारक इतिहास रचला गेला. या सामन्यात मंगोलियाचा संघ 10 षटकात केवळ 10 धावा करत सर्वबाद झाला. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मंगोलियाने प्रत्येक षटकात 1 धावा केल्या आणि 1 विकेट गमावली. मंगोलिया संघाचे एकूण 5 फलंदाज एकही धाव न करताच माघारी परतले. मंगोलिया संघाने एकही चौकार लगावला नाही. संघाच्या एकूण 4 फलंदाजांनी केवळ 01-01 अशा धावा केल्या.
सिंगापूरचा प्रथम फलंदाजीचा निर्णय-
सिंगापूरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सिंगापूरकडून हर्ष भारद्वाजने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. याशिवाय अक्षय पुरीने 2 विकेट्स घेतल्या. राहुल शेषाद्री आणि रमेश कालिमुथू यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या हर्ष भारद्वाजने 4 षटके टाकली, त्यापैकी दोन षटक निर्धाव होते. याशिवाय अक्षय पुरीने 4 षटके टाकली. यामध्ये एक निर्धाव षटक होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 5 चेंडूत सामना जिंकला-
मंगोलिया संघाला अवघ्या 10 धावांत सर्वबाद केल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सिंगापूर संघाने 5 चेंडूत 13 धावांवर एक विकेट्स गमावत विजय मिळवला. यादरम्यान संघाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार मनप्रीत सिंगची (0) विकेट गमावली. त्यानंतर विल्यम सिम्पसनने 2 चेंडूत नाबाद सहा धावा आणि राऊल शर्माने 2 चेंडूत नाबाद 7 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
ट्रॅव्हिस हेडचा नवीन विक्रम-
ट्रॅव्हिस हेडने स्कॉटलंडविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत तो आता मार्कस स्टॉइनिसच्या बरोबरीत पोहोचला. ट्रॅव्हिस हेडने 25 चेंडूत 80 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 12 चौकार आणि 5 षटकार टोलावले. दुसरीकडे, मिचेल मार्शने आपल्या डावात केवळ 12 चेंडूंचा सामना केला. मात्र या छोट्या खेळीत मिचेल मार्शने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले.
संबंधित बातम्या:
6 षटकांत तब्बल 113 धावा चोपल्या...; 9 षटकांत खेळ संपवला, पुन्हा 'हेड' नडला, ऑस्ट्रेलियाचा भीमपराक्रम