Rohit Sharma On T20 Team India : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी (IND vs SL ODI) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. आगामी काळात तो T20 संघाचा भाग असेल की नाही याबद्दल त्याने स्वत:च सांगितले. श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना रोहितने ही माहिती दिली. यावेळी  'मी अजून टी20 क्रिकेट सोडायचा निर्णय घेतलेला नाही', असं स्पष्टपणे रोहितने सांगितलं. 


एकदिवसीय मालिकेपूर्वी खेळलेल्या टी-20 मालिकेत रोहित संघाचा भाग नव्हता आणि त्याच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतर आता रोहित शर्मा टी-20 संघात पुनरागमन करू शकणार नाही, अशा बातम्यांनी जोर धरला होता. याचे उत्तर रोहितने आता दिले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल उत्तर देताना सांगितले की, मी अद्याप टी-20 फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. आता तो आगामी टी-20 मालिकेत भारतीय संघात दिसणार असल्याचे त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्याच्या T20 कारकिर्दीव्यतिरिक्त त्याने इतर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.


पत्रकार परिषदेत रोहित शर्माने दिलेली महत्त्वाची माहिती


• जसप्रीत बुमराहबद्दल अपडेट देताना, रोहित शर्मा म्हणाला की राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या नेटमध्ये गोलंदाजी करताना त्याला पाठीचा थोडा त्रास जाणवल्याने त्याची विश्रांती वाढवली आहे.
• रोहित त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल म्हणाला, 'मी अजून T20 क्रिकेट सोडलेले नाही.
• त्याने संघाच्या सलामीबद्दल सांगितले की आम्ही ईशान किशनला खेळवू शकणार नाही. गिलला संधी देण्यात आली आहे. 


विशेष म्हणजे या सर्व प्रश्नांनंतरही श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेबाबत अनेक प्रश्न कायम आहेत. यामध्ये ओपनिंगबाबत काहीही क्लिअर झालेले नाही. रोहितसोबत, शुभमन गिल किंवा केएल राहुल सलामीला दिसणार आहेत. याशिवाय मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोणाची निवड केली जाईल, हेही स्पष्ट व्हायचे आहे. कारण सूर्या फॉर्मात असला तरी एकदिवसीय क्रिकेटमधील अय्यरचे आकडे खूपच प्रभावी आहेत.  


हे देखील वाचा-