IND vs SL 1st ODI: भारतीय संघ (Team India) 10 जानेवारीपासून (मंगळवार) श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका (India vs Sri Lanka) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचसाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली असून बुमराह मात्र टीमसोबत गेलेला नाही.


बीसीसीआयने अधिकृतपणे ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आगामी काळात असणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे याआधी खुद्द बीसीसीआयनेच बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग बनवण्यात आल्याची माहिती दिली होती. पण आता त्याला आणखी विश्रांती दिल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बोर्डाने दिलेल्या माहितीत म्हटले होते की"अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा संघात समावेश केला आहे." 3 जानेवारीच्या प्रसिद्धीपत्रकात बीसीसीआयने ही गोष्ट सांगितली होती. ज्यानंतर आता मात्र बुमराहची विश्रांती वाढवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.




बुमराह बऱ्याच काळापासून विश्रांतीवर


जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून भारतीय संघापासून दूर आहे. त्यामुळे गेल्या वर्षी खेळलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकालाही तो मुकला होता. त्याच्या प्रकृतीबाबत सागंताना करताना, BCCI ने म्हटले होते की, “बुमराह सध्या पूर्णपणे ठिक होत आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्त घोषित केले असून तोलवकरच भारताच्या एकदिवसीय संघात सामील होईल.” दरम्यान भारतीय संघाला यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी आणि एकदिवसीय विश्वचषक यासारख्या महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा खेळायच्या असल्याने अशा परिस्थितीत बीसीसीआय बुमराहच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.


श्रीलंकेविरुद्ध कसा आहे भारताचा एकदिवसीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (विश्रांतीवर), शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.


हे देखील वाचा-