Prithvi Shaw Viral Video : मुंबईकर पृथ्वी शॉ याला अनेक दिवसानंतर टीम इंडियात स्थान मिळालं होतं. पण प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळालीच नाही. न्यूझीलंडविरोधात झालेल्या तिन्ही टी 20 सामन्यात पृथ्वी शॉ याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. भारतीय संघानं तीन सामन्याची टी 20 मालिका 2-1 च्या फरकानं जिंकली. पृथ्वी शॉ याला एकाही सामन्यात संधी न मिळाल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्तीही केली. संघात स्थान न मिळाल्यामुळे पृथ्वी शॉ याच्या मनातही हूरहूर असेलच... पण हार्दिक पांड्यानं मालिका जिंकल्यानंतर पृथ्वी शॉ याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मालिका विजयाची ट्रॉफी हार्दिक पांड्याने पृथ्वी शॉ याच्याकडे दिली. हार्दिकच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या अखेरच्या टी 20 सामन्यातील हार्दिक-पृथ्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हार्दिक पांड्या विजयी चषक पृथ्वी शॉ याच्याकडे देत असल्याचं दिसत आहे. पृथ्वी शॉ याला मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तिन्ही सामन्यात पृथ्वीला बेंचवर बसावं लागलं होतं. पण हार्दिक पांड्याने विजयानंतर ट्रॉफी दिल्यानंतर पृथ्वी शॉ चकीत झाला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल जाला आहे.
पाहा व्हिडीओ
हार्दिक पांड्या मालिकावीर -
तीन टी 20 सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्या याला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले. तर अखेरच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिल याला सामनावीर पुरसराकाराने सन्मानीत करण्यात आले. शुभममन गिल याने अखेरच्या सामन्यात 63 चेंडूवर 126 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान गिल याने 12 चौकार आणि सात षटकारांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली, त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तिसऱ्या सामन्यात हार्दिकने चार षटकात चार विकेट घेतल्या होत्या.
26 महिन्यानंतर संघात परतला होता पृथ्वी
तब्बल 26 महिन्यानंतर मुंबईकर पृथ्वी शॉ याची टीम इंडियात निवड झाली होती. न्यूझीलंड दौऱ्यानंतर पृथ्वी अखेरचा भारताकडून खेळला होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ याने वारंवार धावांचा पाऊस पाडला होता. पण त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळत नव्हते. मात्र, रणजी ट्रॉफीमध्ये शॉने आसामविरुद्ध 379 धावांची विक्रमी खेळी खेळली आणि निवडकर्त्यांना टीम इंडियामध्ये स्थान देण्यास भाग पाडले. रणजी ट्रॉफीपूर्वी पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही सर्वाधिक धावा केल्या होत्या.
आणखी वाचा :
जिगरबाज हनुमा विहारी! दुखापत झाल्यानंतर एका हाताने केली फलंदाजी, तीन चौकारही लगावले