Hardik Pandya-Natasa Stankovic: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) यांचा 18 जुलै 2024 रोजी घटस्फोट झाला होता. हार्दिक आणि नताशाला एक मुलगा आहे. या मुलाचे दोघंही मिळून सांभाळ करताय.  दरम्यान, नताशासोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका व टीव्ही स्टार जास्मिन वालिया एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. याचवेळी आता नताशाने देखील पुन्हा प्रेमात पडण्यास मी तयार असल्याचं म्हटलं आहे.

नताशा स्टँकोविक काय म्हणाली?

एका मुलाखतीमध्ये नताशा स्टँकोविक म्हणाली की, मागील वर्ष तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. पण आता मी आयुष्यात नवीन सुरुवात करण्यास तयार आहे. मी पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहे. आयुष्यात जे काही येईल ते स्वीकारावं, असं माझं मत आहे. तसेच योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात, असंही नताशा स्टँकोविकने म्हटलं आहे. पुढील वर्षाकडे पाहताना, मी निश्चितच नवीन अनुभवांसाठी, संधींसाठी आणि कदाचित प्रेमासाठी देखील तयार आहे. मी प्रेमात पडण्याच्या विरोधात नाही. आयुष्यात जे काही येईल ते मी स्वीकारण्यास तयार आहे, असं नताशाने स्पष्ट केले.

कोण आहे नताशा स्टँकोविक?

4 मार्च 1992 रोजी नताशाचा सर्बियामध्ये जन्म झाला. वयाच्या 17 व्या वर्षी तिने नृत्य प्रशिक्षण घेतले आणि मॉडेलिंग सुरू केली.  प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' (2013) या चित्रपटातून  बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले. त्यानंतर नताशाने वर्ष 2014 मधील 'बिग बॉस सीझन 8' मध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर तिने नच बलिए या डान्स रिएल्टी शोच्या 9 व्या सीझनमध्येही सहभाग घेतला होता. 2018 मध्ये नताशा ही बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या सुपरहिट गाण्यात अभिनेत्री म्हणूनही दिसली होती. यानंतर नताशाने 'फुक्रे रिटर्न्स' आणि 'झिरो' सारख्या चित्रपटातही काम केले आहे. नताशाने भारतात राहून खूप काम केले आहे पण आता ती सर्बियाला पुन्हा गेली आहे. नताशा ही आता कायमची सर्बियात राहणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

संबंधित बातमी:

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: ना अफेअर, ना भांडण...; 'या' क्षुल्लक कारणामुळे युझवेंद्र चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट झाला, नेमकं काय घडलं?

IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: शशांकने 4,4,4,4,4,4 टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!