IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: आयपीएल 2025 च्या हंगामात पाचवा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Punjab Kings) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने 11 धावांनी विजय मिळवला. पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 97 धावा केल्या. तर शशांक सिंह (Shashank Singh) याने मधल्या फळीत फलंदाजीसाठी येऊन आक्रमक फलंदाजी केली. 

श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक पूर्ण करता आले असते. श्रेयस अय्यरने 42 चेंडूत 97 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 9 षटकार मारले. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात हे श्रेयस अय्यरचे पहिले शतक असू शकले असते. मात्र श्रेयस अय्यरला शतक पूर्ण करता आले नाही. तो नाबाद 97 धावांवर राहिला. श्रेयस अय्यर शतक पूर्ण न करू शकल्याबद्दल शशांक सिंहला जबाबदार धरले जात आहे. या सामन्यात शशांकने 16 चेंडूत 44 धावांची आक्रमक खेळी केली.

शशांक सिंह सोशल मीडियावर ट्रोल-

गुजरातविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने 243 धावा केल्या आहेत. 17 षटकांच्या अखेरीस श्रेयस अय्यरने 90 धावा केल्या होत्या, परंतु पुढील 18 चेंडूंमध्ये त्याला फक्त 4 चेंडू खेळता आले, ज्यामध्ये त्याने 7 धावा केल्या आणि अवघ्या 3 धावांनी श्रेयस अय्यरचे आयपीएलमधील पहिले शतक हुकले. श्रेयस अय्यरचे शतक न होण्यामागे सोशल मीडियावर शशांकला जबाबदरा धरले जात आहे. शशांकने शेवटच्या 18 चेंडूंपैकी 15 चेंडू खेळले, ज्यामुळे शशांकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

सामना संपल्यानंतर शशांक काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर शशांकने श्रेयस अय्यरच्या शतकाबाबत भाष्य केलं. मी मैदानावर येताच श्रेयसने मला पहिल्याच चेंडूपासून मोठे शॉट्स खेळण्यास सांगितले. त्याने मला सांगितले की माझे शतक पाहू नको आणि फक्त मोठे शॉट्स खेळ...त्यामुळे मी काहीही न पाहता चौकार आणि षटकार कसे मारता येईल, हा विचार करत होतो. मी फक्त चेंडूकडे पाहत होतो आणि तो मारत होतो. मी चौकार शोधत होतो. मी ज्या स्थितीत फलंदाजी करतो त्या स्थितीत खेळण्यासाठी संघ आणि व्यवस्थापनाने मला पाठिंबा देणे आवश्यक होते.

संबंधित बातमी:

Glenn Maxwell : जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते.... आयपीएलच्या इतिहासात ग्लेन मॅक्सवेलचा 'लज्जास्पद रेकॉर्ड'