मुंबई : टीम इंडियानं (Team India) दक्षिण आफ्रिकेला टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) च्या अंतिम फेरीत  धावांनी पराभूत करत विजेतेपद मिळवलं. हार्दिक पांड्यानं अंतिम फेरीच्या लढतीत अफलातून कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावांचा यशस्वीपणे बचाव केला. भारतानं हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजेतेपद मिळवलं. हार्दिक पांड्या ज्यावेळी भारतीय संघात अमेरिकेत दाखल झाला त्यावेळी मुंबई इंडियन्सला आलेले अपयश, वैयक्तिक आयुष्यातील समस्या याच्या जोरदार चर्चा होत्या. हार्दिक पांड्या भारतात परत आला तेव्हा तो टी 20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसह परतला. विश्वचषकातील  दमदार कामगिरीनंतर हार्दिक पांड्यानं एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं  तुमच्या सेटबॅकपेक्षा कमबॅक दमदार करा, असं म्हटलं. 


हार्दिक पांड्यानं शेअर केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडीओत  गेल्या वर्षभरातील आठवणी मांडल्या आहेत. वनडे वर्ल्ड कपमध्ये दुखापत झाल्यानं बाहेर पडावं लागणं, आयपीएल मधील अपयश ते टी 20 वर्ल्ड कपमधील विजय हे सर्व हार्दिकनं एका व्हिडीओतून मांडलं आहे. हार्दिक पांड्यानं या व्हिडीओसोबत तुम्हाला बसलेल्या सेटबॅकपेक्षा तुम्ही कमबॅक दमदार करा, असं म्हटलं आहे. 


हार्दिक पांड्यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहा डावात 144 धावा केल्या आहे. तर, त्यानं आठ मॅचेसमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत. हार्दिकनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या.


हार्दिक पांड्याची पोस्ट :







हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 मध्ये टीकेचा सामना करावा लागला होता. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करण्याचा निर्णय मुंबईच्या मॅनेजमेंटनं घेतला होता. रोहित शर्माऐवजी हार्दिकडे नेतृत्त्व दिल्यानं चाहते नाराज झाले होते.


हार्दिक पांड्याकडे टी 20 संघाचं नेतृत्त्व येणार?


रोहित शर्मानं भारताला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून दिल्यानंतर टी 20  क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. विराट कोहलीनं देखील निवृत्ती जाहीर केल्यानं आता भारताचा टी 20 क्रिकेटमधील कॅप्टन कोण असा सवाल केला जात आहे. शुभमन गिल, केएल राहुल आणि शुभमन गिल यांची कॅप्टन पदाच्या शर्यतीत आहेत. यामध्ये हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर आहे. हार्दिक पांड्याला कॅप्टन पद मिळणार का हे पाहावं लागेल.


दरम्यान, हार्दिक पांड्यानं आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला एकदा विजेतेपद तर एकदा उपविजेतेपद मिळवून दिलं आहे. त्यामुळं आता आगामी काळात भारतीय संघाचं नेतृत्त्व कोणत्या खेळाडूकडे जाणार हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या :



Kuldeep Yadav: कुलदीप यादवने दिली गुड न्यूज, लवकरच लग्नबंधनात अडकणार, म्हणाला, बॉलिवूड अभिनेत्रीसोबत...