Happy Birthday AB de Villiers: दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सचा आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करीत आहे. मिस्टर 360 च्या नावानं प्रसिद्ध असलेल्या या स्फोटक फलंदाजानं चार वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी आणि महान फलंदाजांमध्ये एबी डिव्हिलियर्सचं नाव आवर्जून घेतलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर असलेले काही विक्रम आजही अबाधित आहेत.  


एबी डिव्हिलियर्सचा जन्म 17 फेब्रुवारी 1984 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या वार्मबाद येथे झाला. एबीचे वडील डॉक्टर आहेत. त्याला दोन मोठे भाऊ आहेत. ज्यांचं नाव जान डिव्हिलियर्स आणि वेसल्स डिव्हिलियर्स आहे. एबी डिव्हिलियर्सला आज महान खेळाडू म्हणून ओळखले जातं, याचं सर्व श्रेय त्याचा वडिलांचा जातंय. त्यांनीच एबीला क्रिकेट खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. एबी डिव्हिलियर्सनं केवळ क्रिकेटमध्येच नव्हेतर, जुनिअर लेवलवर गोल्फ, टेनिस आणि यांसारख्या खेळातही सहभाग घेतलाय.





 


सर्वात वेगवान शतक
डिव्हिलियर्सनं इंग्लंडविरुद्ध 2005 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 14 वर्षाच्या कारकिर्दीत त्यानं 223 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 9 हजार 577 धावा केल्या आहेत. यात 53 अर्धशतकांचा समावेश आहेत. एबीच्या नावावर सर्वात जलद शतकाची नोंद आहे. याशिवाय, डिव्हिलियर्सच्या नावावर सर्वात जलत 150 धावा केल्याचाही विक्रम आहे. त्यानं वेस्टइंडीज विरुद्ध 2015 साली 64 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. 


अखेरच्या 20 षटकात शतकीय खेळी
एबी डिव्हिलियर्सनं हा एकमेक खेळाडू आहे. ज्यानं 30 षटकानंतर फलंदाजी करण्यासाठी येऊन शतक ठोकलं होतं. त्यानं अशी कामगिरी दोनदा केलीय. 


एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम
एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आतंरराष्ट्रीय एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. त्यानं 2015 साली एकदिवसीय विश्वचषकात एकूण 32 षटकार मारले आहेत. एवढेच नव्हेतर, विश्वचषकाच्या एकाच सामन्यात 16 षटकार मारून त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
एबी डिव्हिलियर्सनं 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या एबी डिव्हिलियर्सनं देशांतर्गत क्रिकेट लीगमध्ये खेलताना दिसत आहे. नुकताच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात एबी डिव्हिलिर्यस संघात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, ही केवळ एक चर्चाच ठरली.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha