Happy Birtday R Ashwin: भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन (Ravichandran Ashwin) आज त्याच्या 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अश्विन हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 442 विकेट्सची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनसह पहिल्या स्थानावर आहे. इतकंच नव्हेतर, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द सिरीज' जिंकण्याऱ्या खेळाडूंच्या यादीतही अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. सलामीवीर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आर अश्विननं अप्रतिम गोलंदाजी करत जगावर छाप सोडलीय. 


आर अश्विन शालेय जीवनात क्रिकेट खेळायचा,  तेव्हा तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरायचा. तसेच तो मध्य वेगवान गोलंदाज म्हणून संघात होता. परंतु, त्याचे बालपणीचे प्रशिक्षक सीके विजय यांनी आर अश्विनच्या क्रिकेट प्रवासाला नवं वळण दिलं आणि त्याला फिरकीपटू बनवलं. सीके विजय यांचा हा निर्णय योग्य ठरला. प्रथम एक फिरकी गोलंदाज म्हणून त्यानं भारतीय संघात स्थान मिळवलं आणि अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांची जागा भरून काढली. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम रचत गेला. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 659 विकेट्स
आर अश्विननं 5 जून 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केलं होतं. त्यानंतर पुढील सात दिवसांत त्याची भारताच्या टी-20 संघात निवड झाली. कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण करण्यासाठी अश्विनला जवळपास दीड वर्ष प्रतिक्षा करावी लागली. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेटमध्ये अश्विननं आतापर्यंत 659 विकेट्स घेतल्या आहे. त्यानं कसोटीत 442, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 151 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 66 विकेट्स घेतल्या आहेत.


आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेणारा पहिला भारतीय
आर अश्विन बल्लेबाजी में भी वह खासे कामयाब रहे हैं. अपने इंटरनेशनल करियर में वह 5 शतक और 13 अर्धशतक जड़ चुके हैं. उन्होंने अपनी सभी शतक टेस्ट मैचों में जड़ी हैं. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची धावांची सरासरी 32.20 इतकी आहे. क्रिकेटमध्ये अनेक कर्तृत्व गाजवणारा अश्विन टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज आहे.


हे देखील वाचा-