Ravichandran Ashwin on Gautam Gambhir Test Record : कोलकातानंतर दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीमध्ये टीम इंडियाचा पुन्हा पराभव केला. पाहुण्या संघाने गुवाहाटीमधील दुसरा कसोटी सामना 408 धावांनी जिंकला. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिका 2-0 अशी जिंकली. गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. धावांच्या बाबतीत, हा भारताचा सर्वात मोठा कसोटी पराभव आहे. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली आहे. गेल्या 13 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतीय संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा कलंक लागला.

Continues below advertisement

गुवाहाटीत भारताला कसोटी क्रिकेटमधील धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव सहन करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीर यांना मुख्य प्रशिक्षक पदावरून काढण्याची मागणी आणखी जोर धरू लागली. इतकेच नाही तर बरसापारा मैदानाबाहेर गंभीरच्या विरोधात घोषणाबाजीही झाली. या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांनी गंभीर यांचं समर्थन केलं आहे.

आपल्या यूट्यूब चॅनेलवरील चर्चेत अश्विन म्हणाला की, “आपण जबाबदारीची मागणी करतो, ते सोपं असतं, कारण आपल्याला माहित आहे की भारतीय क्रिकेटमध्ये खूप पैसा गुंतलेला असतो. अनेक जण जबाबदारी उचलण्यासाठी तयार असतात. पण खरी गोष्ट अशी आहे की कोच बॅट घेऊन मैदानात उतरू शकत नाही. तो फक्त खेळाडूंना मार्गदर्शन आणि सल्ला देऊ शकतो.”

Continues below advertisement

‘गौतम गंभीर माझा पाहुणा नाहीत…’ (Gautam Gambhir is not my relative R Ashwin)

अश्विन पुढे म्हणाला की, “टीम व्यवस्थापन करणं सोपं नाही. हो, त्यांनाही या पराभवाचं दुःख झालंच असेल, हे आपल्याला समजून घ्यायला हवं. हे कोणाच्या बाजूने उभं राहणं नाही. गंभीर माझा कोणताही नातेवाईक नाही. मीही त्यांच्या दहा चुका सांगू शकतो. चुका सगळ्यांकडून होतात.”

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने 19 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताला 7 विजय मिळाले, 10 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आणि 2 सामने बरोबरीत सुटले.

गौतम गंभीर राजीनाम्यावर काय म्हणाला? (Gautam Gambhir Resignation)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी गौतम गंभीरनं स्वीकारली आहे. दोष सर्वांचा पण सुरुवात माझ्यापासून करा, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. माझ्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. इंग्लंडमध्येही माझ्या मार्गदर्शनाखाली चांगला खेळ केला. तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली चँपियन्स ट्रॉफी, आशिया चषक ही स्पर्धा जिंकली हेही लक्षात ठेवा, असं गौतम गंभीरने दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर सांगितले. 

हे ही वाचा -

Rohit Sharma ODI Rankings : रोहित शर्माला आयसीसीचं ब्रॅड ॲम्बेसेडरपद फळलं, दुसऱ्याच दिवशी आनंदाची बातमी, पुन्हा झाला वनडेचा 'बादशहा'