Rohit Sharma Back No 1 ICC ODI Rankings : रोहित शर्माची 2026 टी20 विश्वचषकासाठी ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. आयसीसी चेअरमन जय शाह यांनी स्वतः ही माहिती देत रोहितची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, गेल्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावरून घसरलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर गेला आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत रोहितने एकही वनडे सामना खेळलेला नाही. तरीही तो पुन्हा नंबर वनचा दर्जा मिळवण्यात यशस्वी ठरला. यंदाच्या रँकिंगमध्ये वरच्या क्रमांकांवर फारसे बदल झाले नाहीत, मात्र टॉप-10 मधील खालच्या स्थानांवर थोडे फेरबदल दिसून आली आहेत.
रोहित शर्मा पुन्हा नंबर वन फलंदाज (Rohit Sharma Back No 1 ICC ODI Rankings)
भारतीय संघाचे अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा हा 781 रेटिंगसह पुन्हा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सर्वात वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या स्थानी गेलेला न्यूझीलंडचा डेरिल मिचेल आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहेत. कारण, आयसीसीच्या नियमानुसार कोणतीही टीम खेळत असताना त्या संघातील एखादा खेळाडू विश्रांतीवर असेल तर त्याची रेटिंग हळूहळू कमी होत जाते. न्यूझीलंडने मिचेलशिवाय सामने खेळल्यामुळे त्यांची रेटिंग घसरली आणि तो आता 766 वर आला आहे.
गिल चौथ्या तर कोहली पाचव्या स्थानावर...
वनडे रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान तिसरा क्रमांक कायम आहे. त्याची रेटिंग 764 आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल 745 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली 725 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम (722) सहाव्या आणि आयर्लंडचा हॅरी टेक्टर (708) सातव्या क्रमांकावर आहेत.
श्रेयस अय्यरची घसरण, शाई होपची झेप
वेस्ट इंडीजचा स्टार फलंदाज शाई होप दोन स्थानांची झेप घेत 701 रेटिंगसह आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा श्रेयस अय्यर एका स्थानाने खाली येत नवव्या क्रमांकावर आहे. त्याची रेटिंग 700 आहे. श्रीलंकेचा चरिथ अस्लंका 690 रेटिंगसह दहाव्या स्थानावर असून त्यालाही एका स्थानाचे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा -