India vs England Test Series : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात श्रेयस अय्यरची निवड न झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. अय्यरने आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ससाठी 514 धावा करत उत्तम कामगिरी केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएल 2025 मध्ये प्रभावी कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. असे असूनही, त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या निर्णयावर बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, "सध्या संघात त्याच्यासाठी जागा नाही".

दरम्यान, श्रेयस अय्यरला कसोटी संघातून वगळण्याबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मौन बाळगले. अय्यरबद्दल चर्चा असूनही, गंभीरने या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बुधवारी माध्यमांशी बोलताना अय्यर यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात त्याची निवड न करण्याबाबत तीन शब्दांत उत्तर दिले.

श्रेयस अय्यरची निवड न करण्याबाबत माध्यमांशी बोलताना प्रमुख गौतम गंभीर म्हणाले, मी निवडकर्ता नाही. श्रेयस अय्यरला संघातून वगळण्याबाबत लोक प्रश्न उपस्थित करत आहे, पण करुण नायर आठ वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या विक्रमी कामगिरीबद्दल नायरला बक्षीस मिळाले आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी अय्यरच्या वगळण्यावर टीका केली होती. त्यांच्या मते, अय्यरने अलीकडील काळात चांगली कामगिरी केली असूनही, त्याला संधी न मिळाल्यामुळे निवड प्रक्रियेतील एकसंधता आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होतात. या निर्णयामुळे अय्यरच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. आगामी सामन्यांमध्ये त्याला पुन्हा संधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरचा धुमाकूळ 

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, श्रेयस अय्यर या आयपीएल हंगामात उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने पंजाब किंग्जसाठी 14 सामन्यांमध्ये 514 धावा केल्या आहेत. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाब किंग्ज 2014 नंतर पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

भारताचा इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघ (2025)

कर्णधार : शुभमन गिल

उपकर्णधार आणि विकेटकीपर : ऋषभ पंत

फलंदाज :

यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी,

ऑलराउंडर :

रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर

गोलंदाज :

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव,

विकेटकीपर :

ध्रुव जुरेल

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक -

पहिली कसोटी- 20-24 जून, 2025 - हेडिंग्ले, लीड्सदुसरी कसोटी- 2-6 जुलै, 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅमतिसरी कसोटी- 10-14 जुलै, 2025 - लॉर्ड्स, लंडनचौथी कसोटी- 23-27 जुलै, 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरपाचवी कसोटी- 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन