India vs Pakistan Live : सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला मात दिल्यानंतर आता भारत हाँगकाँगविरुद्ध सामना (India vs Hong Kong) खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सामना आहे. विशेष म्हणजे ग्रुप स्टेजमधील भारताचा हा अखेरचा सामना असून हा जिंकल्यास भारत पुढील फेरीत पोहोचणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.


कधी आहे सामना?


31 ऑगस्ट रोजी भारत आणि हाँगकाँग यांच्यातील आशिया चषकातील सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सामना सुरु होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार (Hotstar) अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   


भारत विरुद्ध हाँगकाँग सामना होऊ शकतो चुरशीचा


भारत आणि हाँगकाँग सामन्याबद्दल बोलताना निझाकत खान म्हणाला की, ''आम्ही भारताविरुद्ध 2018 आशिया चषक स्पर्धेत शेवटचा सामना खेळलो होतो. आम्ही तो सामना फक्त 20 धावांनी गमावला. टी-20 सामन्यात काहीही होऊ शकते. कोणत्या षटकात गोलंदाज कधी चांगली गोलंदाजी करेल किंवा फलंदाज कधी स्फोटक धावा काढेल हे तुम्हाला माहीत नाही. आघाडीचे संघ कसे पराभूत झाले हे देखील आपण यापूर्वी पाहिले आहे. आम्ही सकारात्मक माइंडसेटने मैदानात जाणार आहोत.'' दरम्यान खानच्या या वक्तव्यावरुन भारत विरुद्ध हाँगकाँग सामना चुरशीचा होऊ शकतो. 


कसे आहेत दोन्ही संघ?


भारताचा संघ:


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.


हाँगकाँगचा संघ:


निजाकत खान (कर्णधार), किनचित शाह, जीशान अली, हारून अरशद, बाबर हयात, आफताब हुसेन, अतीक इकबाल, एजाज खान, एहसान खान, स्कॉट मॅककेनी (विकेटकीपर), गजनफर मोहम्मद, यासिम मुर्तजा, धनंजय राव, वाजिद शाह, आयुष शुक्ला, अहान त्रिवेदी, मोहम्मद वहीद


हे देखील वाचा- 


Mohammad Amir : हार्दिक पांड्याच्या ट्वीटवर मोहम्मद आमिरच्या प्रतिक्रियेनं जिंकली सर्वांची मनं, नक्की काय म्हणाला पाकिस्तानचा गोलंदाज 


IND vs PAK : हार्दीक पांड्याने रन करावे म्हणून म्हणून संपूर्ण संघ प्रार्थना करत होता, सामन्यानंतर भुवनेश्वरनं केला खुलासा