Leopard Attack On Guy Whittall : झिम्बाव्बेचा माजी अष्टपैलू खेळाडू बिबट्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचवालाय. पाळीव कुत्रा मदतीसाठी देवासारखा धावून आला, त्यामुळे जीव वाचला. झिम्बाव्बेचा माजी खेळाडू गाय व्हिटल याच्यावर गेल्या आठव्यात एका बिबट्यानं हल्ला केला होता. 52 वर्षीय व्हिटल या हल्ल्यातून थोडक्यात बचावलाय, कारण त्याच्या मदतीला पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला. गाय व्हिटल याच्या पत्नीनं सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. सोशल मीडियावर गाय व्हिटल याच्याबाबत चर्चा सुरु आहे. 


झिम्बाव्बेचा माजी अष्टपैलू खेळाडू गाय व्हिटल याच्यावर बिबट्यानं हल्ला केला. पाळीव कुत्र्यामुळे त्याचा जीव वाचला, पण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याआधी 2013 मध्ये गाय व्हिटल याच्या बेड खाली तब्बल 8 फूट मगर आले होते, त्यावेळी ते बेडवर झोपलेले होते. आता बिबट्याच्या हल्ल्यात गाय व्हिटल गंभीर जखमी झालाय. सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरु आहे.  


सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो


गाय व्हिटल याच्या पत्नीनं बिबट्याच्या हल्ल्याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. गाय व्हिटल यांचा जखमी अवस्थेतील फोटोही पोस्ट केला आहे. व्हिटलच्या शरिरावर रक्त दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत व्हिटल रुग्णालयात उपचार घेत असल्याचं दिसत आहे. गाय व्हिटलची पत्नी हना स्टूक्स यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 52 वर्षीय गाय व्हिटल ट्रेकिंग करण्यासाठी गेला होता. पण त्यावेळी त्याच्यावर अचानक एका बिबट्यानं हल्ला केला. सोशल मीडियावर गाय व्हिटल याचा जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर नेटकरी गाय व्हिटल याच्या आरोग्यसाठी प्रार्थना करत आहेत. तो लवक ठीक व्हावा असेही म्हटले जातेय.





गाय व्हिटलचं क्रिकेट करियर - 


गाय व्हिटल याने 1993 मध्ये झिम्बाव्बेसाठी पदार्पण केले होतं. 2003 मध्ये त्यानं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. गाय व्हिटल यानं 46 कसोटी, 147 वनडे सामन्यात झिम्बाव्बेचं प्रतिनिधित्व केलेय. कसोटी क्रिकेटमध्ये गाय व्हिटेज याच्या नावावर द्विशतकही आहे. गाय व्हिटेज यानं कसोटीत 2207 धावा केल्यात, तर वनडेमध्ये 2705 धावा जमवल्या आहेत. कसोटीमध्ये व्हिटलच्या नावावर चार शतके आहेत.  तर वनडे क्रिकेटमध्ये त्यानं 11 अर्धशतकं ठोकली आहेत.