Sara Lee Passes Away: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेन्ट (World Wrestling Entertainment) म्हणजेच डब्लूडब्लूईची (WWE) पहिलवान सारा लीचं निधन झालंय. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. सारा लीच्या निधनाच्या बातमीला तिची आई टेरी लीनं दुजोरा दिलाय. सारा लीच्या आईनं केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की, हे सांगताना अतिशय दुख होतंय की, साराली आपल्याला सोडून देवाघरी गेली आहे. तिच्या मृत्युनं आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे.

सारा लीने 2015 मध्ये वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) रिअॅलिटी स्पर्धा टफ इनफ जिंकली. मात्र, या वृत्तानंतर डब्लूडब्लूईच्या विश्वात शोककळा पसरली आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. डब्लूडब्लूईची निक्की ऍशनं फोटो शेअर करत लिहिले की,"तू खूप चांगली होतीस, तू तुझ्या कुटुंबावर आणि मित्रांवर खूप प्रेम केलंस, तू मला हसवलेस. आय लव्ह यू सारा." 

डब्लूडब्लूईचं ट्वीट-

 

चेल्सी ग्रीनचं ट्विटचेल्सी ग्रीननं सारा लीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केलाय. तिनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, कोणतंही ट्विट किंवा शब्द या सुंदर माणसाला परत आणू शकत नाहीत. परंतु माझं संपूर्ण हृदय आणि वेस्टिन ब्लेक तिच्या कुटुंबियासाठी आहे. तिनं पुढं म्हटलंय की, सारा लीची खूप आठवण येईल.

सारा लीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल2016 मध्ये सारा लीने डब्लूडब्लूई मध्ये करिअरला सुरुवात केली होती. तिनं सुद्धा अनेक सामने आत्तापर्यंत गाजवले आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर अधिक चर्चा असायची. तिच्या चांगल्या मॅचचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सारा लीचा व्हिडिओ-

 

हे देखील वाचा-