लंडन : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (Eng vs WI) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु झाला आहे. या कसोटीत वेस्ट इंडिजनं (West Indies ) टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या (England) फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडनं कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम नावावर केला आहे. इंग्लंडनं नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज स्टेडियममध्ये 4.2 ओव्हरमध्ये 26 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. इंग्लंडच्याच नावावर कसोटीत सर्वात वेगवान 50 धावा करण्याचा विक्रम होता. इंग्लंडनं 30 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं आहे. 11944 मध्ये ओवलमध्ये इंग्लंडनं दक्षिण आफ्रिके विरुद्ध 27 धावांमध्ये 50 धावांचा टप्पा पार केला होता. 
 
वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा सलामीवर जॅक क्रॉले पहिल्याच ओव्हरमध्ये अल्जारी जोसेफच्या बॉलिंगवर बाद झाला. तो शुन्यावर बाद झाला. सलामीवीर बेन डकेट आणि ओली पोप यांनी आक्रमक फलंदाजी केली. डकेटनं दुसरी ओव्हर टाकणाऱ्या जेडन सील्सच्या गोलंदाजीवर सलक चार चौकार मारले. पोपनं तिसऱ्या ओव्हरमध्ये अल्जारी जोसेफला दोन चौकार मारले. डकेटनं चौथ्या ओव्हरमध्ये दोन चौकार मारले. पाचव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर चौकार मारत इंग्लंडनं 50 धावा पूर्ण केल्या.  


बेन डकेटचं अर्धशतक


बेन डकेटनं 32 धावांमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. डकेट इंग्लंडसाठी कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारा सलामीवर ठरला आहे. त्यानं 59 बॉलमध्ये 14 चौकारांसह 71 धावांची खेळी केली. 19 व्या ओव्हरमध्ये तो बाद झाला. शमर जोसेफच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. जेसन होल्डरनं त्याचा कॅच घेतला. डकेटनं पोप सोबत 105 धावांची भागिदारी केली. 


50 धावांचा टप्पा वेगात ओलांडणाऱ्या इंग्लंडनं मात्र वेगवान 100 धावा पूर्ण करण्याची संधी गमावली. इंग्लंडनं 17.5 ओव्हरमध्ये शंभर धावा पूर्ण केल्या. इंग्लंडनं 1994 मध्ये 13.3 ओव्हरमध्ये ओवल कसोटीत 100 धावा पूर्ण केल्या होत्या भारतानं2023 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 12.2 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या आहेत. 


दरम्यान, इंग्लंडनं वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केलं होतं. इंग्लंडनं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडनं डावान विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला वेस्ट इंडिज पराभूत करणार का हे पाहावं लागणार आहे. 


संबंधित बातम्या :