Corona Report of Ashes Players: इंग्लंड संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकच खळबळ माजलीय. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या (AUS Vs ENG) सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. या खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आलीय. मेलबर्न क्रिकेट मैदानावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सर्व खेळाडूंची तपासणी करण्यात आली.


क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मंगळवारी एका निवेदनात म्हटले की, कालच्या खेळानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांच्या सर्व खेळाडूंची पीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. याचबरोबर दोन्ही संघातील खेळाडूंच्या कुटुंबीयांचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आलंय. इंग्लंड संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य पॉझिटिव्ह आढळले. इंग्लंडच्या पॉझिटिव्ह आलेल्या सपोर्ट स्टाफसह त्यांचे नातेवाईकही आयसोलेशनमध्ये आहेत. 


याआधी इंग्लंड कॅम्पमध्ये चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकच खळबळ माजली होती. यामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळदेखील अर्धा तास उशीरानं सुरू करण्यात आला होता. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याअगोदर इंग्लंड संघातील सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर इंग्लंडच्या संघातील खेळाडू आणि इतर स्टाफची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची मेलबर्न ग्राऊंडच्याकडं रवानगी करण्यात आली. एवढेच नव्हेतर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडच्या संपूर्ण संघाची पीसीआर टेस्ट देखील करण्यात आली. 



  • LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-