England vs India 3rd Test Update : लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जो रूट, जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी पहिल्या डावात तुफानी फलंदाजी केली. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑली पोप यांनी 44-44 धावांचे योगदान दिले. ज्यामुळे पहिल्या डावात संथ फलंदाजी असूनही इंग्लंडचा संघ 400 धावांच्या जवळ पोहोचला. दुसरीकडे, गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, जसप्रीत बुमराहने टीम इंडियाकडून 5 बळी घेतले. तर नितीश कुमार रेड्डी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. रवींद्र जडेजाने 1 विकेट घेतला.

जो रूट आणि ऑली पोपची शतकी भागीदारी

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने गोलंदाजीत चांगली सुरुवात केली, कारण नितीश कुमार रेड्डी यांनी एकाच षटकात बेन डकेट आणि जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवून 44 धावांवर इंग्लंडला दोन धक्के दिले. त्यानंतर जो रूट आणि ऑली पोप यांनी मिळून 109 धावा जोडल्या, ज्यामुळे इंग्लिश संघाने 150 धावांचा टप्पा ओलांडला. पोप 44 धावा काढून बाद झाला, त्यानंतर थोड्याच वेळात हॅरी ब्रूकही 11 धावांवर बाद झाला.

पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस जो रूटने 99 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने 4 गडी गमावून 251 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी इंग्लंड संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा जसप्रीत बुमराहने स्टोक्सला 44 धावांवर क्लीन बोल्ड केले. स्टोक्सच्या काही वेळातच बुमराहने शतकवीर जो रूटलाही बाद केले. रूटने 104 धावा केल्या.

बुमराह लढला, पण शेवटच्या 3 विकेट्सनी ठोकल्या 116 धावा!

एकेकाळी इंग्लंडने 271च्या धावसंख्येत 7 विकेट गमावल्या होत्या. त्यांना 300-320 च्या धावसंख्येपर्यंत पोहोचणेही कठीण वाटत होते. अशा परिस्थितीत जेमी स्मिथने 51 धावा आणि ब्रायडन कार्सने 56 धावा केल्या. दोघांमधील 84 धावांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडला मोठी धावसंख्या गाठता आली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्या, पण गेल्या सामन्यात 10 विकेट घेणाऱ्या आकाशदीपला यावेळी एकही विकेट घेता आली नाही.

हे ही वाचा -

Eng vs Ind 3rd Test : पहिल्या डावात फक्त 10 खेळाडू करणार फलंदाजी? ICC चा नियम अन् टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, कसे ते समजून घ्या