Eng vs Ind 3rd Test : पहिल्या डावात फक्त 10 खेळाडू करणार फलंदाजी? ICC चा नियम अन् टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, कसे ते समजून घ्या

Rishabh Pant Injury Update : भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून लॉर्ड्स येथे खेळला जात आहे.

Continues below advertisement

rishabh pant injury update

Continues below advertisement
1/9
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून लॉर्ड्स येथे खेळला जात आहे.
2/9
ऋषभ पंतला भारतीय संघात यष्टिरक्षक म्हणून स्थान देण्यात आले होते, परंतु दुसऱ्या दिवशी ध्रुव जुरेल यष्टिरक्षक म्हणून खेळत आहे.
3/9
खरंतर, सामन्याच्या पहिल्या दिवशी पंतला बोटाला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
4/9
आता प्रश्न असा आहे की, जेव्हा टीम इंडिया फलंदाजीसाठी येईल, तेव्हा पंत स्वतः फलंदाजीसाठी येईल की त्याच्या जागी आलेल्या ध्रुव जुरेलला फलंदाजीची परवानगी दिली जाईल.
5/9
बीसीसीआयने अलीकडेच एक अपडेट दिले होते की, ऋषभ पंत दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत, ध्रुव जुरेलने त्याच्या जागी यष्टिरक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे.
Continues below advertisement
6/9
आता प्रश्न असा आहे की जर ऋषभ पंत दुखापतीमुळे संपूर्ण सामना खेळू शकत नसेल, तर त्याच्या जागी कोण फलंदाजी करेल?
7/9
आयसीसीच्या नियमांनुसार सामन्याच्या मध्यभागी बदली खेळाडू म्हणून येणारा खेळाडू सामन्यात क्षेत्ररक्षण, विकेटकीपिंग करू शकतो, परंतु तो फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही.
8/9
अशा परिस्थितीत, जर पंत लॉर्ड्स कसोटीत वेळेत परतू शकला नाही, तर ध्रुव जुरेलला त्याच्या जागी फलंदाजी करण्याची संधी दिली जाणार नाही.
9/9
जर अशी परिस्थिती भारतीय संघ 11 ऐवजी 10 फलंदाजांसह खेळेल.
Sponsored Links by Taboola