England Playing 11 : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेतली असून आता उद्यापासून (23 जून) तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यास सुरुवात होत आहे. दरम्यान या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांची अंतिम 11 जाहीर केली आहे. यामध्ये केवळ एक बदल करत मागील सामन्यातील 10 खेळाडूंना संधी दिली आहे. 


या सामन्यात संघाचा दिग्गद गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) दुखापतीमुळे संघात नसेल. त्याच्या जागी इंग्लंडचा युवा गोलंदाज जिमी ओवरटन डेब्यू  कऱणार आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिमी ओवरटन खेळणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत ट्वीटही केलं आहे.



संघात केवळ एक बदल


ओवरटन याला संधी देण्याशिवाय कोणताही बदल इंग्लंड संघाने केलेला नाही. या एका बदलाशिवाय इतर सर्व प्लेईंग 11 मागील सामन्याप्रमाणेच ठेवली आहे. खराब फॉर्ममध्ये असणारा सलामीवीर जॅक क्राउली याला इंग्लंड संघाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर बेन स्टोक्सही कोरोनावर मात करुन शेवटच्या सामन्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे.


इंग्लंडचे अंतिम 11 : अॅलेक्स ली, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), मॅटी पॉट्स, जेमी ओवरटन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच.


हे देखील वाचा-