T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात आज इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा (England vs Pakistan) सहा विकेट्स राखून पराभव केलाय. ब्रिस्बेनच्या (Brisbane) द गाबा स्टेडियमवर (Gabba) हा सामना खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळं हा सामना 19-19 षटकाचा खेळण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघानं आठ विकेट्स गमावून इंग्लंडसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं 14.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रीदी फ्लॉप ठरला. या सामन्यात आफ्रिदीला एकही विकेट्स मिळवता आली नाही.


इंग्लंडकडून हॅरी ब्रूकनं सर्वाधिक 24 चेंडूत 45 धावांची खेळी केली. ज्यात दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. तर, सॅम करननं दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 14 चेंडूत 33 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम जूनिअरनं दोन विकेट्स घेतल्या. तर, शादाब खान आणि नसीम शाह यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


इंग्लंडची खराब सुरुवात
पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला तीन धावांवर फिलिप सॉल्टच्या रुपात पहिला धक्का लागलाय. त्यानंतर मोहम्मद वसीम जूनिअरनं बेन स्टोक्सला माघारी धाडलं. स्टोक्सनं अवघ्या 18 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटनं 36 धावा केल्या. स्टोक्सनं त्याच्या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. एलेक्स हेल्सही 9 धावांवर असताना शादाब खानच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनला मोहम्मद वसीमनं मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर 16 चेंडूत 28 धावा केल्या.


शादाब खानच्या खांद्यावर पाकिस्तानच्या संघाची जबाबदारी
या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या कर्णधार जोस बटलरनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमच्या अनुपस्थितीत  शान मसूद आणि हैदर अली सलामीसाठी मैदानात आले. या सामन्यात शादाब खाननं पाकिस्तानच्या संघाचं नेतृत्व केलं.


पाकिस्तानचा संघ:
हैदर अली (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान (कर्णधार), मोहम्मद नवाज, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, हारिस रउफ, फखर जमान, शाहीन अफरीदी.


इंग्लंडचा संघ: 
फिलिप सॉल्ट, एलेक्स हेल्स, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोइन अली, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), सॅम करन, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, डेविड व्हिली, डेविड मलान, ख्रिस वोक्स, रीस टोपले, मार्क वुड.


हे देखील वाचा-