India tour of England: भारत आणि इंग्लड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅम (Birmingham) येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी चांगली फलंदाजी करणाऱ्या सॅम बिलिंग्ज आऊट होताच विराट कोहली (Virat Kohli) आनंदानं नाचू लागला. त्यावेळी हिंदीमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) विराटच्या डान्सवर आक्षेपार्ह वक्यव्य केलं. ज्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवागला ट्रोल केलं जातंय.
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 60 व्या षटकात मोहम्मद सिराजनं सॅम बिलिंग्सला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्लीपमध्ये फिल्डिंग करणारा विराट कोहलीनं नाचायला सुरुवात केली. त्यावेळी वीरेंद्र सेहवान म्हणाला की, विराट कोहलीचा डान्स तर बघा, छमिया नाचत आहे. विराट कोहलीबाबत सेहवागनं केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. वीरेंद्र सेहवागच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
नेटकऱ्यांकडून राजीनाम्याची मागणी
वीरेंद्र सेहवागच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी वीरेंद्र सेहवागला ट्रोल केलं आहे. चाहत्यांनी सेहवागला त्याच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सेहवागला कॉमेंट्री टीममधून वगळावं अशाही मागण्यांनी जोर धरलाय. याआधी वीरेंद्र सेहवागनं विराट कोहलीसोबतच्या स्लेजिंगनंतर जॉनी बेअरस्टोची फलंदाजीची भूमिका पूर्णपणे बदलल्याचं म्हटलं होतं.
हे देखील वाचा-