ENG vs IND 1st T20: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बर्मिंगहॅम कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकून भारतीय संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. साउथॅम्प्टनमधील (Southampton) द रोज बाऊल स्टेडियममध्ये (The Rose Bowl) हा सामना खेळला जातोय. आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.


भारत- इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना कधी, कुठे रंगणार?
भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-20 सामना आज (गुरुवार, 7 जुलै) साउथहॅम्प्टन येथील एजिस बाउल स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला रात्री 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव (SonyLiv) वर थेट प्रक्षेपित केला जाईल. 


विराट, ऋषभ, रविंद्र जाडेजा आणि बुमराहला विश्रांती
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत, अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. 


भारताची प्लेइंग इलेव्हन: 
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल. 


इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:
जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार, यष्टीरक्षक), डेविड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, रीस टोपले, मॅथ्यू पार्किन्सन.


हे देखील वाचा-