Duleep Trophy : Duleep Trophy : बंगळुरू आणि अनंतपूरमध्ये दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी अनेक मोठे खेळाडू फेल ठरले. यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाले. दरम्यान, 19 वर्षीय खेळाडू मुशीर खानने पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात 181 धावांची खेळी केली होती. या खेळीसह त्याने महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात सचिनने 159 धावांची इनिंग खेळली होती. मात्र, हा विक्रम मोडल्यानंतर तो दुसऱ्या डावात खाते न उघडताच बाद झाला. भारत अ संघाचा वेगवान गोलंदाज आकाशदीप सिंगच्या चेंडूवर त्याला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने झेलबाद केले. आता मुशीर आऊट झाल्याने संघ अडचणीत आला आहे.
मुशीर खान दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाकडून खेळत आहे, ज्याचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आहे. भारत ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 321 धावा केल्या, ज्यात मुशीरने 181 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात शुभमन गिलच्या भारत अ संघ केवळ 231 धावांत आटोपला. आता भारत ब संघाने दुसऱ्या डावात 3 विकेट गमावल्या आहेत. यशस्वी जैस्वाल 13 धावांवर प्रथम बाद झाला, त्यानंतर लगेचच मुशीरही बाहेर पडला. कर्णधार अभिमन्यूही 22 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारत ब संघ पहिल्या डावात 90 धावांनी आघाडीवर होता. 3 विकेट्स गमावल्यानंतर सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी डावाची धुरा सांभाळली आणि धावसंख्या 50 च्या पुढे नेली. हे वृत्त लिहिपर्यंत संघाच्या 70 धावा झाल्या होत्या. यासह एकूण आघाडी 158 धावांची झाली आहे. पंत 24 धावा केल्यानंतर आणि सरफराज 30 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे.
पहिल्या डावातही इंडिया-बी संघाने केवळ 91 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. यानंतर सरफराजचा भाऊ मुशीरने बॅटने चमत्कार दाखवला. त्याने 373 चेंडूत 5 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 181 धावा केल्या. एवढेच नाही तर त्याने गोलंदाज नवदीप सैनीसोबत 205 धावांची भागीदारी केली जी दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील आठव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली.
मुशीर खान नेहमीच मोठ्या प्रसंगी चमकदार कामगिरी करताना दिसला आहे. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने द्विशतक झळकावले. त्याने उपांत्य फेरीत 55 धावांची खेळी केली आणि रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले.
हे ही वाचा -