Abhishek Jain Sidearm Specialist : एक महिन्याच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 19 सप्टेंबर पासून भारताला मायदेशात बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत असणार आहे. मायदेशात असल्यामुळे भारतीय खेळाडूंना ही मालिका जड जाणार नाही. पण भारताची पुढील मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. जी ऐतिहासिक अशी बॉर्डर गावसकर ट्रॉफी आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, जी कुठेतरी भारतीय खेळाडूंना खडतर जाईल.
कारण ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर जास्त बाउन्स पाहायला मिळतो. पण मागील बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय खेळाडूंनी गाबामध्ये इतिहास रचला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघाने गाबामध्ये ऑस्ट्रेलियाला तिथे धूळ चारली. उसळत्या खेळपट्टीवर भारताची अशी कामगिरी पाहून सर्वजण चकित झाले. पण त्या कामगिरीच्या मागे एक असा चेहरा लपला होता ज्याला कोणीही पाहिले नसेल किंवा त्याचे नावही ऐकलं नसेल तो म्हणजे अभिषेक जैन.
कोण आहे अभिषेक जैन?
अभिषेक जैन हा एक साईड आर्म स्पेशालिस्ट आहे, जो मुंबईच्या सर्व खेळांडूची प्रक्टीस घेतो. साईड आर्म स्पेशालिस्ट खेळाडूंना पेस बॉलरची प्रॅक्टीस देतो. तो 135 ते 104 पेक्षा आधिक स्पीडची प्रक्टीस आणि सगळे बॉलिंगची लाईन टाकतो, त्यामध्ये कव्हर ड्राईव्ह, यॉरकर, पूल शॉट, कट शॉट असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टीस होते आणि बॅट्समनला चांगल्या बॅटींगसाठी आणि चांगला पेसवर खेळाण्यासाठी रेग्युलर साईड आर्म प्रक्टीस महत्त्वाची असते.
अभिषेकच्या सहकार्याने एमएस धोनी, राहणे,जैस्वाल यासारख्या दिग्गजांनी केला सराव
केएल राहुल, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, सुर्याकुमार यादव, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, अजिंक्य राहणे, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, वॉशिग्टन, सुंदर, सिध्देश लाड, सरफराज खान, अभिषेक शर्मा, अंगक्रिश रघुवंशी, शिवम दुबे, अदित्य तारे यासह 340 खेळाडूंनी त्याच्या सहकार्याने सराव केला आहे. खरंतर, खेळाडूआधी मुंबई क्रिकेट क्लबसोबत करार करतात, पण त्यानंतर खेळाडू अभिषेक जैनसोबत संपर्क साधून प्रक्टीससाठी बोलावतात.
अभिषेक जैनला क्रिकेटर व्हायचं होतं पण...
अभिषेक जैन अष्टपैलू खेळाडू आहे. जो चांगली फलंदाजी सुद्धा करत होता, पण घरातील परिस्थिती बिकट होती आणि कोणाचा सपोर्ट मिळाला मिळाला नाही. त्यामुळे त्याचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्यानंतर 2016 मध्ये अभिषेकने क्रिकेट बंद केलं आणि नंतर 2017 साली त्याने साईड आर्मचा सराव चालू केला. आतापर्यंत त्याने अनेक दिग्गज खेळाडूंसोबत प्रॅक्टीस केली आहे आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढवला आहे.